जळगाव (संपादक सुनिल पाटील) – केंद्र सरकारने आणलेल्या शेतकरी विरोधी कायद्याची सोमवारी जळगाव शहरात युवक कॉंग्रेसच्यावतीने शेतकरी विधेयकाची अंत्यविधी करून त्याचा जाहीर निषेध करत सदरचे कायदे रद्द करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली.

कृषी विधेयक शेतकरी विरोधी राक्षस आहे आणि हे विधेयक काही दिवसात शेतकऱ्या चां मानगुटीवर बसुन त्यांना संपवण्याचे काम करेल या विधेयकास आज मागे घेण्यासाठी लाखो शेतकरी आंदोलन करत आहे परंतु केंद्रशासित भाजप सरकार साखर झोपेत आहे. विधेयक रूपी राक्षस मानगुटीवर बसण्यापूर्वी विधेयक मागे घेण्याची मागणी युवक काँग्रेस तर्फे करण्यात आली.

राक्षस रूपी विधयाकाचे युवक काँग्रेस चे प्रदेश सरचिटणीस मुकतदीर बाबा देशमुख व मुजीब पटेल युवक काँग्रेस शहर अध्यक्ष नेतृत्वात दहन करण्यात आले त्यावेळी शहर अध्यक्ष नदीम काझी, शहर जिल्हा उपाध्यक्ष शाम तायडे,nsui जिल्हा अध्यक्ष देवेंद्र मराठे, जमील शेख, अमजद पठाण, दीपक सोनावणे, आकाश दायामा, उपस्थित होते







