रावेर शहरात भारत बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

raver-bharat-band

रावेर (प्रतिनिधी हमीद तडवी) – काल दिनांक ८/१२/२०२० वार मंगळवार रावेर यावल तालुक्याचे आमदार मा.आमदार शिरीषदादा मधुकरराव चौधरी यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडी व मित्रपक्ष व विविध संघटना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना बी.एस,पी, वंचित बहुजन आघाडी, राष्ट्रीय मूलनिवासी,अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद युवक सेल नवी दिल्ली,अखिल भारतीय आदिवासी एकता परिषद , आदिवासी तडवी भिल्ल एकता मंच,यांच्या वतीने शेतकरी व बळीराजा यांचे मूळ मालकत्व अस्तित्व व अस्मिता डॉ.स्वामिनाथन समितीने सुचवलेल्या शेतकऱ्याच्या उत्थानाचा मूळ गाभा च्या मर्मावर लक्ष्यवेधी साठी सर्वपक्षीय संघटना व विविध संघटना केंद्र सरकारच्या विरोधात एक उद्रेकाची झलक म्हणून रावेर शहरात संपूर्णपणे भारत बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद देण्यात आला सर्व पक्षीय व संघटनांनी सामुदाईक नेतृत्व करण्यात आले.

 

भाजपा प्रणीत केंद्र सरकारने शेतकरी विरोधी तीन काळे कायदे करून घाट घातलेला आहे. लोकशाही प्रणाली देशात संसद भवनात कुठलीही शेतकरी हिताची चर्चा न करता कुठल्याही राजकीय पक्षांना विश्वासात न घेता विश्वास घातकी निर्णय घेण्यात आलेला आहे. अध्यक्षीय हुकुमशाही पद्धतीला देशातील तमाम शेतकरी राजा, आदिवासी,दलित,शेतमजूर, कामगार ,कृषी उत्पन्न बाजार समित्या, हमाल, मापाडी वर्ग होरपोळून निघाला आहे.

 

भाजपा केंद्र सरकारच्या विरोधात हि आर-या-पार ची लढाई आहे. या लढ्यात रावेर तालुका इंदिरा कॉंग्रेस भवनातून सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी सक्रीय सहभागात महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अनुसूचित जमाती विभाग तथा जळगाव जिल्हा अध्यक्ष दिलरुबाब इकबालखा तडवी, अनुसूचित जाती विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष राजीव सवर्णे, जिल्हा उपाध्यक्ष – महेश रामचंद्र तायडे, रावेर तालुका कॉंग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर हरिभाऊ महाजन, सरचिटणीस- रामदास सेनू लहासे, सरचिटणीस – अॅड. योगेश गजरे, सेवादल कॉंग्रेस तालुकाध्यक्ष भरत शिवाजी कुंवर, जफुरुल्लाखान रहिमतुल्ला खान मास्टर, तालुका उपाध्यक्ष- मिलिंद भागवत पाटील, विनायक श्यामू महाजन, संतोष लालचंद पाटील, रमेश कदम, प्रतिक ज्ञानेश्वर खराले, दत्तात्रय रामदास सोनार, संदीप वेडू लहासे, न्याजुद्दिन तडवी, भिकारी तडवी आदी सहभागी झाले होते.

 

 

मूलनिवासी राष्ट्रीय अध्यक्ष – दिलीप कांबळे,माजी युवक कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष- पंकज वाघ, रावेर कृषी उत्पन्न बाजारसमिती- डॉ.राजेंद्र नारायण पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेस किसान सेल जिल्हाध्यक्ष- सोपान बाबुराव पाटील, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख- प्रल्हाद महाजन, शिवसेना तालुकाध्यक्ष- योगीराज गबाजी पाटील, शिवसेना शहरप्रमुख -राकेश घोरपडे, सामाजिक समता मंच -उमेश गाढे, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद – राजू तडवी, अखिल भारतीय आदिवासी एकता परिषद – बी.आर.तडवी, रहेमान तडवी आदी सहभागी झाले होते.

 

आदिवासी एकता तडवी भिल्ल एकता मंच जिल्हाध्यक्ष- सलीम तडवी, रावेर तालुकाध्यक्ष – नबाब तडवी, नशीर तडवी, सर्फराज तडवी, बबिता तडवी, कॉंग्रेस किसान सेलचे तालुकाध्यक्ष- जिजाबराव पाटील, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष- बाळू शिरतुरे, बी.एस.पी. तालुकाध्यक्ष- संतोष ढिवरे, ईश्वर जाधव शे.इसामोहम्मद कालुभाई, राष्ट्रवादी जेष्ठ नेते रमेश नागराज पाटील, सचिन पाटील, लोक संघर्ष मोर्चा – नूरमोहम्मद तडवी, कॉंग्रेस चे –अय्युब खान पठाण, गयासभाई सलीमभाई, महेमूद शेख, संजय जाधव धोबी, भूपेश जाधव , प्रकाश सूरदास, कैलास वाणी, सूर्यभान चौधरी आदी सहभागी झाले होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here