आरपीआय आठवलेचे प्रदेश सरचिटणीस डॉ.जयचंद कासलीवाल यांचे निवेदन
औरंगाबाद (विशेष प्रतिनिधी) – सिग्मा हॉस्पीटलचे मालक डॉ उन्मेष टाकळकर व डॉ समद पटेल डॉ रोटे डॉ झाडे शासकीय वैदकिय रुग्णालयातील कोरोना चाचणी करणारे एच आर सी टी चे डॉक्टर इतर डॉक्टर कर्मचारी स्टाफ आणि दोषींवर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा आणि कडक कार्यवाही करण्यात यावी अन्यथा दिनांक 29/12/2020. मंगळवार पासून जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आमरण उपोषण करण्यात येईल .अशी मागणी डॉ जयचंद भाऊ कासलीवाल प्रदेश सरचिटणीस रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले चे रिपब्लिकन एम्प्लॉइज फेडरेशन चे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस यांनी एका प्रसिध्दी पत्रकच्या माध्यमातून करण्यात आली.
या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, दिनांक 03/12/2020. रोजी वार गुरवार सिग्मा हॉस्पीटल चे मालक डॉ उन्मेष टाकळकर, डॉ समद पटेल डॉ रोटे डॉ झाडे शासकीय वैदकिय रुग्णालयातील कोरोना चाचणी करणारे एच आर सी टी चे डॉक्टर कर्मचारी स्टाफ आणि इतर डॉक्टर व दोषींवर मनुष्य वधाचा गुन्हा नोंद करण्यात यावा अन्यथा दिनांक 29/12/2020. मंगळवार पासून औरंगाबाद येथील जिल्ाधिकारी कार्यालय परिसरात आमरण उपोषण करण्यात येईल आणि दिनाक.14 जानेवारी 2021. रोजी मा. ना राजेश भै्यासाहेब टोपे यांच्या जालना येथील निवास्थानी आत्म्म दहन करण्यात येईल आणि याची सर्वस्वी जबाबदारी मा. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, मा. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, मा. आरोग्य मंत्री राजेश भैय्या साहेब टोपे, मा. ना. गृहमंत्री अनिल देशमुख जिल्हाधिकारी औरंगाबाद, डॉ उन्मेष टाकळकर डॉ समद पटेल डॉ रोटे डॉ झाडे शासकीय शासकीय वैदकिय रुग्णालयातील कोरोना चाचणी करणारे एच आर सी टी चे डॉक्टर इतर कर्मचारी स्टाफ व इतर डॉक्टर आणि जे जे दोषी आहेत त्यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी.
झुंबर लाल मोतीलाल कासलीवाल हे सिरीयस नव्हते आणि त्यांच्या प्रकृती मध्ये सुधारणा झाली होती परंतु त्यांचे खोटे रिपोर्ट तयार करून व आमच्यावर दादागिरी करून दबाव टाकून गुंड प्रवृत्तीच्या लोकांना हाताशी धरून धमकी दिली होती त्या सर्व गोष्टी दिनांक 16/10/2020. ते 27/10/2020. चे सिग्मा हॉस्पीटल चे रुग्णालयातील सी सी टी वी मध्ये दिसून येत आहे व इतर भरपूर रुग्णाचा अश्याच पद्धतीने वध करण्यात आलेला आहे. ज्या रुग्णांना कोरोनाचे कुठलेही लक्षण नसताना सुध्दा त्यांची सुध्दा चाचणी पॉझिटीव्ह कशी काय येते याचा सुध्दा खुलासा करावा आणि आम्ही नेहमी मागणी करून सुध्दा सी सी टी वी चा व्हिडिओ फुटेज अद्याप पर्यंत देण्यात आलेले नाही आम्हाला त्यांच्या फेवर चे फोटो चे फुटे ज देण्यात आले होते परंतु आम्हाला प्रत्येक सेकंदाचा व्हिडिओ हवा आहे आणि तो खूप मोठा पुरावा आहे
यामुळे इतर ज्या ज्या रुग्णाचा वध करण्यात आला ते सर्व दिसून येईल आणि यांचे सर्व काळा बाजार हा सुध्दा उघडकीस येईल डॉ उन्मेष टाकळकर हे दबाव टाकतात दादागिरी करतात गुंड प्रवृत्तीच्या गुन्हेगार लोकांना हाताशी धरून धमकी देतात त्यांच्या पासून मला व माझ्या परिवाराच्या जीवितास धोका निर्माण झाला असून आम्हाला पोलीस संरक्षण देण्यात यावे. झुंबर लाल कासलीवाल यांना कुठलीही ट्रीटमेंट देण्यात आली नाही कुठलेही रेम डी सिविर इंजेक्शन प्लाझा देण्यात आले नाहीत कुठलेही ट्रीटमेंट देण्यात आली नाही जेवण देण्यात आले नाही ज्या आवश्यक गोष्टी होत्या त्या काहीच करण्यात आल्या नाहीत आणि वरील सर्वांनी मिळून झुंबर लाल कासलीवाल यांचा वध केलेला आहे आणि हे सर्व सिग्मा हॉस्पीटल चे सी सी टी वी फुटे ज मध्ये दिसून येईल तरी वरील सर्व डॉक्टर स्टाफ कर्मचारी व दोषींवर मनुष्य वधाचा गुन्हा नोंद करण्यात यावा अन्यथा मी वरील तारखे पासून जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आमरण उपोषणाला बसणार आहे आणि वेळ प्रसंगी आत्मदहन सुध्दा करण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले चे प्रदेश सरचिटणीस डॉ जयचंद भाऊ कासलीवाल महाराष्ट्र राज्य भारत यांनी एका प्रसिध्दी स दिलेल्या पत्रकाचे माध्यमातून देण्यात आला.
आपणास आद्याप पर्यंत सी सी टी वी चे व्हिडिओ फुटेज देण्यात आले नाही खूप वेळा वेग वेगळ्या व्यक्तीनं कडून दबाव टाकण्यात आला. मी सर्वांना घोषणा केली होती की दिनांक.15/12/2020. पासून जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आमरण उपोषणाला बसणार आहे परंतु काही कारणास्तव मी दिनांक.29/12/2020. मंगळवार पासून औरंगाबाद येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आमरण उपोषण करणार आहे. कृपया उपोषण स्थळी कोणीही गर्दी करू नये, असे डॉ जयचंद भाऊ कासलीवाल.यांनी या पत्रकारत शेवटी म्हटले आहे.







