मुंबई (प्रतिनिधी लक्ष्मण राजे) – धडक कामगार युनियनच्या वसई जनसंपर्क कार्यालयाचे उद्घघाटन विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर व धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांच्या हस्ते मंगळवार, दिनांक 8 डिसेंबर 20 रोजी सकाळी 11 वाजता शास्त्रीनगर, इंडीयन ओव्हरसिज बँक जवळ, वसई (प.)येथे करण्यात आले.

महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे या युनियनचे प्रेरणास्थान असून धडक कामगार युनियनचे आज महाराष्ट्रभरात 10 लाखांहून अधिक सभासद आहेत. कामगार नेते अभिजीत राणे यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या या युनियनचे हजारो कंपन्यांमध्ये जाळे आहे. कामगारांना न्याय देणारी एकमेव अशी प्रतिष्ठित युनियन म्हणून आज महाराष्ट्रात भरात या युनियनची ख्याती आहे. तसेच महाराष्ट्र प्रदेश , उपाध्यक्ष उत्तम कुमार यांनी जास्तीतजास्त संख्येने कामगार यावेळी उपस्थित होते अशी माहिती दिली.







