खुलताबाद (प्रतिनिधी सलमान खान) – तालुक्यातील एकूण 39 ग्रामपंचायतीचे सरपंच पदाचे आरक्षण मंगळवारी खुलताबाद येथील डॉ.जाकिर हुसैन कॉलेज येथे जाहिर करण्यात आले.
खुलताबाद तालुक्यातील अनुसूचित जाती साठी कानडगाव/ महमदपुर ,पळसवाडी , रसूलपुरा (महिला), पिंप्री (महिला),अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी खांडी पिंपळगाव/जाफरवाडी, पाडळी/सोबलगाव(महिला) ,नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी देवळाना बुद्रुक ,बाजार सावंगी, खिर्डी ,गदाना ,लोणी, वडोद बुद्रुक(महिला), मावसाळा(महिला), गोळेगाव(महिला),टाकळी रा.रा.(महिला), सराई(महिला), म्हैसमाळ(महिला) इत्यादी ग्रामपंचायती आरक्षित झाल्या. खुल्या प्रवर्गातील कसाबखेडा(महिला), ताजनापुर(महिला), निरगुडी बुद्रुक(महिला) सुलीभंजन(महिला) ,सोनखेडा(महिला), तिसगाव(महिला), वेरूळ(महिला), धामणगाव(महिला) ,चिंचोली(महिला), घोडेगाव(महिला), तिसगाव तांडा(महिला) कागजीपुरा, विरमगाव ,गल्ले बोरगाव, भडजी, झरी, बोडखा ,कनकशीळ, दरेगाव ,सुलतानपूर ,येसगाव, पळसगाव याप्रमाणे आरक्षण जाहीर झाले.
आरक्षण सोडतीसाठी तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार तहसीलदार प्रभाकर गवळी तलाठी डीपी गोरे,विनेश महेर विनोद जाधव भगवान घुसळे, हरिदास पांढरे संजय भुंगे विलास वाहुळ,कारभारी घुसळे इत्यादींनी अथक परिश्रम घेतले.







