- संताजी जगनाडे महाराज चरित्रावर आधारित प्रश्न मंजुषेचे आयोजन
पारोळा (प्रतिनिधी) – कोरोना संकट काळ असल्याने आज शहराचे राज्य शिक्षक मनवंतराव साळुंखे , वरीष्ठ शिक्षक गुणवंतराव पाटील यांनी परिवार व परिसरातील विद्यार्थ्यांसह आपल्या निवासस्थानी संत शिरोमनी संताजी जगनाडे महाराज यांची जयंती उत्साहात साजरी केली .
सर्वांनी त्यांच्या प्रतिमेचे पूजन केले . बालकांनी लेखक वामनराव चौधरी लिखित संताजी जगनाडे महाराज चरित्रमालेल्या आवृत्तींचे क्रमाक्रमाने वाचन केले .मुख्याध्यापक साळुंखे यांनी संताजी जगनाडे महाराज यांचे जीवन चरित्र विद्यार्थ्यांसमोर मांडले . संत तुकाराम महाराज व त्यांच्या गाथा आणि संताजी जगनाडे महाराज याबाबत बालकांना विस्तृत माहिती दिली .
या वेळी उपस्थित व परिसरातील विद्यार्थ्यांसाठी संताजी जगनाडे महाराज यांच्या जीवन चरित्रावर आधारित प्रश्नमंजुषाही आयोजित करण्यात आली आहे . वामनराव चौधरी लिखित या पुस्तिका आठ दिवस विदयार्थ्यांना वाचण्यास देवुन त्यावर पंचविस वस्तुनिष्ठ प्रश्नांची प्रश्न पत्रिका त्यांना सोडविण्यास देण्यात येणार आहे . तोंडी किंवा पुस्तकातुनही उत्तरे सोडविण्याची मुभा आहे . सहभागी प्रत्येक विद्यार्थ्याला बक्षिस दिले जाणार आहे . विद्यार्थ्यांनी महान संत चरित्र वाचावे व त्यांचा आदर्श घ्या आणि तो लक्षात ठेवुन आचरणात आणावा हा त्यामागे उद्देश आहे . प्रितेश राजेंद्र चौधरी, साई ऑनलाइन पारोळा यांनी शाळेसाठी संताजी जगनाडे महाराज यांची सुंदर प्रतिमा भेट दिली आहे .







