चोपडा तालुका शेतमजुरांचे अधिवेशनात दिल्ली येथील शेतकरी आंदोलनास पाठिंबा

chopada

चोपडा (प्रतिनिधी संदीप ओली) – येथे महात्मा फुले नगर मध्ये शेतमजूर युनियनचे नेते कॉम्रेड अमृत महाजन यांचे अध्यक्षतेखाली 6 डिसेंबर 2020 बाबासाहेब आंबेडकर महापरीयान दिन सामाजिक समता दिवस पाळण्यात येऊन चोपडा तालुका शेतमजुरांचे अधिवेशन घेण्यात आले ..

अधिवेशनाचे उद्घाटन शिरपूरचे प्रसिद्ध कम्युनिस्ट नेते काॅ अडवोकेट मदन परदेशी यांनी अहिराणी भाषेत भाषण करून शेतमजुरांच्या समस्यां वर प्रकाश पडला व अधिवेशनाचे उद्घाटन केले या अधिवेशनाला नागलवाडी चोपडा बुधगाव मोहिदा मोहिदा कुरवेल वढोदा खरग आडगाव धनवाडी व चोपडा शहर मधून चाळीस-पंचेचाळीस प्रतिनिधी आले होते. या गावातील शेतमजूर आदिवासी ४०/४५ प्रतिनिधी आले होते. अधिवेशनास एडवोकेट संतोष पाटील, लक्ष्मण शिंदे, गोरख वानखेडे ,यांनी मार्गदर्शन केले जळगाव जिल्हा शेतमजूर युनियन कार्याध्यक्ष लक्ष्मण शिंदे यांनी व इतर कार्यकर्ते यांनी उपस्थित मार्गदर्शक पाहुण्यांचे शाल व पुष्पहार देऊन जळगाव जिल्हा लालबावटा शेतमजूर युनियनतर्फे स्वागत केले..

अधिवेशन प्रारंभ होण्याचे एक तास अगोदर चोपडा बस स्टँड पासून मजूर प्रतिनिधी ची मिरवणूक काढण्यात येऊन छत्रपती शिवाजी महाराज डॉ बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधी यांच्या पुतळ्यांना हार घालून विनम्र अभिवादन करण्यात आले..
वाजंत्री च्या नादात शेतमजुरांची छोटेखानी मिरवणूकीनंतर महात्मा फुलेनगर मध्ये शेतमजुरांचे उत्साहात अधिवेशन घेण्यात आले.. या अधिवेशनात शेतमजूर वर्ग हा शेतकऱ्यांचा मित्र आहे ..म्हणून गेल्या बारा दिवसापासून दिल्लीमध्ये लाखो शेतकरी केंद्र सरकारने केलेल्या तीन कृषी कायदे रद्द करण्यासाठी ठाण मांडून बसलेल्या शेतकरी शेतकरी आंदोलक बांधवांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला आठ डिसेंबर रोजी देशव्यापी भारत बंद यशस्वी करा असे आवाहन करण्यात आले आहे

खालील प्रमाणे ठराव करण्यात आले १)६० वर्षे वयावरील शेतमजुरांना तीन हजार रुपये पेंशन द्यावे २) वर्षानुवर्ष सरकारी गावठाणात ग्रामीण व शहर भागात राहणाऱ्या शेतमजुरांची राहत्या घराची अतिक्रमण कायम करण्यात यावी व घरकुल योजनेचा लाभ देण्यात यावा घरकुल योजनेचा लाभ देताना लाच घेणे बंद करा ३) अंगणवाडी जिल्हा परिषद शाळा या ताबडतोबीने सुरू करण्यात याव्यात ४) कोरोना काळातील वीज बिल माफ करण्यात यावी ५)मागेल त्याला रेशनकार्ड देण्यात यावी ६)आम आदमी विमा योजना सुरू ठेवा(६) श्रावण बाळ योजना तिल रखडलेले मानधन त्वरित अदा करा अर्ज प्रकरणे मार्गी लावा७) आदिवासी वनाधिकार कायदा खालील प्रकरणे निकालीकाढा ८) एपीएल कार्डधारकांना निम्म्या किंमतीत धान्य लाभ द्या.९) शेतमजुरांना कामात द्या. आदी मागण्यांचे ठराव करण्यात आले व या मागण्यांचा पाठपुरावा साठी येत्या 24 डिसेंबर रोजी चोपडा तहसीलवर मोर्चा काढण्याचा ईशारा अध्यक्षीय भाषण करताना अमृत महाजन यांनी दिला आभार प्रदर्शन धनवाडी येथील माजी उपसरपंच कॉम्रेड शांताराम पाटील यांनी केले

शेतमजुरांना आवाहन… करण्यात आले की ,येत्या ग्रामपंचायत ग्रामपंचायत निवडणुकीत शेतमजुरांनी सरपंच व सदस्य या निवडणुका पूर्ण ताकतीने लढवाव्यात लढवाव्यात .त्यासाठी गावातील शेतमजुरां विषयी चांगली नीतिमत्ता असलेल्यां शेतकरी पुढाऱ्यांशी युती करावी असे आवाहन करण्यात आले अधिवेशन यशस्वी करण्यासाठी श्रीमती हिराबाई सोनवणे रेखाबाई भालेराव भागवत पाटील निर्मलाबाई पाटील, चंद्रकलाबाई पाटील लेनिन महाजन छोटू कोळी ,अंजली बारेला, सुमनबाई महाजन, यशवंत पाटील सुशीलाबाई पाटील , हिम्मत पाटील, दिवान पाटील धुडकू पाटील, संजय भील ,लोटन भील मदन भील, सुरेश बारी आदींनी नी मदत झाली सरतेशेवटी तालुक्यातील शेतकरी संघटनेला चालना देण्यासाठी पंचवीस कार्यकर्त्यांची तालुका कमिटी निवडण्यात आली व त्यांची शिबिर घेण्याचे नियोजन मोहिदा गावी करण्यात आले शिबिराची जबाबदारी कॉ वासुदेव कोळी व आशाबाई पाटील यांनी स्वीकारली..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here