पाटण (शरद घाडगे) – बहुजन परिवर्तन पार्टी प्र महाराष्ट्र राज्य महिला बचाव समिती रजि यांच्या मार्फत युवा अध्यक्ष कराड मेंहुल सर्जेराव आंबवडे यांच्या नेतृत्वाखाली डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान राजगृहवर अज्ञातांनी तोडफोड केल्याने संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन करण्यात आले. यावेळी कराड अध्यक्ष नायब व तसिलदार देवकर साहेब यांना निवेदन देण्यात आले, तसेच आरोपीला लवकरात लवकर अटक करण्यात यावी अशी मागणी कराड युवा अध्यक्ष मेंहुल सर्जेराव आंबवडे व इतर पदाधिकारी कार्यकर्ते यांनी केली.
शासनाच्या निवेदन देऊन आम्ही करोना संकटकाळी शासनाने नियम व अटी पाळून आम्ही आंदोलन करण्यात आले. करोना संकटकाळी यांचा फायदा घेऊन दोन माथेफिरुंनी हा प्रकार केलाय यात त्यांनी घराबाहेरील सीसीटीव्ही चे ही नुकसान केलंय पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत, आंबेडकर कुटुंबियांकडून घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना देण्यात आले आहे. आरोपींचा तातडीने शोध घेऊन अटक करण्याची मागणी करण्यात येत आहे लवकरात लवकर आरोपीला अटक करण्यात यावी नाहीतर महाराष्ट्रभर आंदोलन करू, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.







