रायगड (विकास राठोड) – अलिबाग पोलीस ठाणे हद्दीत दिनांक 02/07/2020 रोजी 11.30 वा. सुमारास फिर्यादी सौ.अलका नरेश आमले वय-53 रा.चोंढी ता.अलिबाग ह्या सिव्हील हॉस्पीटल ते एस.टी.स्टँड अलिबाग या रोडने पायी चालत येत असताना अलिबाग जुनी नगरपालिका नाका येथे आलेवेळी 04 आरोपी पैकी 02 आरोपी यांनी फिर्यादीला ब्राम्हणाला मुलगा झाला आहे तो गरिब महिलांना साडी, चप्पल व पैशाचे वाटप करीत आहे तुम्ही तुमचे अंगावरील सोन्याचे गंथन पर्समध्ये काढून ठेवा तरच तुम्हाला साडी, चप्पल व पैसे भेटतील असे बोलले असता फिर्यादीने त्यांचे बोलणेवर विश्वास ठेऊन आपले गळ्यातील एकूण 80,000/- रुपये किंमतीचे दोन तोळे सोन्याचे गंथन पर्स मध्ये काढून ती पर्स पिशवीत ठेवली असता आरोपीत याने हातचालाखी करून फिर्यादीला फसवुन सदरची पर्स काढून घेऊन फिर्यादीची फसवणूक करून अपहार केला.
याबाबत फिर्यादी यांनी अलिबाग पोलीस ठाणे येथे येऊन फिर्याद दिल्याने अलिबाग पोलीस ठाणे गु.र.नं. 85/2020 भा.द.वि.सं.कलम 417, 420, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करून गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन अलिबाग पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी श्री. कोल्हे यांनी तात्काळ सदर बाबत वरिष्ठांना कळऊन अलिबाग पोलीस ठाणेचे तपास पथक तयार करून एका तासाच्या आत 1) संतोष गंगाराम चौरे, रा. रा.बालाजी टाँकीज समोरील झोपडपटी कोपरखैरणे रेल्वे स्टेशन जवळ ठाणे मुळ रा.जनताबाजार झोपडपटटी अकोला एसटी स्टॅन्ड समोर ता.अकोला, 2) गोविंद काशिराम काळे, रा.कुळगाव, डोंबिवली, मूळ रा.नरळद, ता.गंगाखेड, जि.परभणी 3) बालाजी कैलास चव्हाण, सध्या रा.कोळेगाव दत्त दर्शन सोसायटी, डोंबिवली जि. ठाणे मूळ रा.नरळद, ता.गंगाखेड, जि.परभणी 4) जयराम किसन पवार,रा.ओम अपार्टमेंट चाळ रुम नं.9 खडकपडा आरटीओ कार्यालयाच्या मागे कल्याण जि. ठाणे मुळ रा.निमगाव जि.नांदेड यांना तवेरा वाहनासह जेरबंद केले व आरोपींकडुन 80,000/- रुपये किमतीचे एक सोन्याचे पान असलेले सुमारे 02 तोळे वजनाचे गंथन हस्तगत करण्यात आले आहे. तपासादरम्यान आरोपींनी रायगड जिल्ह्यात कर्जत पोलीस ठाणे येथे -02, पेण पोलीस ठाणे येथे -03 अश्या प्रकारचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.
सदरची कारवाई मा.पोलीस अधीक्षक श्री.अनिल पारस्कर यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनानुसार व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री.सचिन गुंजाळ यांचे अधिपत्याखाली मा.उप विभागीय पोलीस अधिकारी अलिबाग श्रीमती सोनाली कदम, पोलीस निरीक्षक श्री.कोल्हे यांच्या तपास पथकातील सपोनि श्री.कुंदन गावडे, पोहा/हंबीर, पोना/पिंगळे, पोशी/फड यांनी पार पाडली आहे.







