जळगाव (संपादक सुनिल पाटील) – सदैव जनसेवेच्या ध्यासाने झपाटलेला चिरतरुण नूरुद्दिन मुल्लाजी असे प्रतिपादन निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे जिल्हा सहसचिव विजय लुल्हे यांनी केले .कासोदा तालुका एरंडोल येथील ज्येष्ठ पत्रकार नूरुद्दिन मुल्लाजी यांचा सत्कार निसर्ग समिती व जनमत प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव येथे एम.जे.कॉलेज जवळील कार्यालयात दि. ९ डिसेंबर २०२० रोजी सोशल डिस्टन्सींगचे नियम पाळून करण्यात आला .
याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते विजय लुल्हे बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोचिंग क्लासेस असोसिएशन महाराष्ट्र राज्य उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष प्राध्यापक पंकज नाले असून प्रमुख अतिथी भाजपा जळगाव जिल्हा संयोजक सोशल मीडियाचे अक्षय चौधरी,ज्येष्ठ कार्यकर्ते संजय चौधरी, सोपान पाटील ( पिंप्राळा ) मान्यवर उपस्थित होते . विजय लुल्हे यांच्या हस्ते पत्रकार नुरुद्दीन मुल्लाजी यांचा शाल तसेच पूज्य साने गुरुजी लिखित ” ईस्लामी संस्कृती ” ग्रंथ देऊन हृद्य सत्कार करण्यात आला .
लुल्हे आपल्या भाषणात पुढे म्हणाले की ,” नूरुद्दीन गांधीवादी कार्यकर्ते असून ‘ समाज प्रबोधन ‘, ‘दीनदलितांना शासकीय सवलतींचा लाभ मिळवून देणारे नि:स्वार्थी कार्यकर्ते ‘, ‘ धार्मिक सलोखा व शांतता निर्मितीसाठी अहोरात्र झटणे ही त्यांच्या कार्याची यशस्वी त्रिसूत्री आहे.”आदरणीय नुरुद्दिन मुल्लाजींच्या उत्तुंग समाजकार्याची दखल घेउन मिळालेल्या राज्यस्तरीय डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम राष्ट्रीय उभारणी प्रेरणा पुरस्कार ( ड्रिम फाऊंडेशन सोलापूर ),गांधी वर्ल्ड पीस टेक्नॉलॉजी अवार्ड इंडिया,महात्मा गांधी ग्लोबल पीस अवार्ड ओडिसा इंडिया,महात्मा गांधी ग्लोबल पीस मेसेंजर अवार्ड, ह्युमॅनिटी सोशल वर्क अवार्ड ( गुजरात ), हयुमॅनिटी अँन्ड पीस अँबेसेडर मद्रास अशा पुरस्कारांनुसार विविध क्षेत्रातील कार्यगौरवाचा लेखाजोखा मांडून मुल्लाजींचे विशेष अभिनंदन केले .प्रा पंकज नाले आपल्या भाषणात म्हणाले की ,” नुरुद्दीन मुल्लाजी यांचे कार्य समाज कार्याचा दिपस्तंभ आहे .शैक्षणिक व सामाजिक कार्याने एरंडोल नगरीचा नावलौकीक मुल्लाजींनी देशभरात वाढविला.”
सत्काराला उत्तर देतांना नुरुद्दिन मुल्लाजी नम्रतापूर्वक म्हणाले की ,” पुरस्कारांनी मला आनंद न वाटता मला अद्याप किती वंचिंताची सेवा करता आली नाही व कोणत्या क्षेत्रात मी सेवेसाठी पोहोचू शकलो नाही याची क्षणोक्षणी खंत वाटत राहते.” पुरस्कारांनी हुरळून गेले की कार्याची उंची खुंटते आणि प्रसिद्धीच्या कोरोनाने बाधित होऊन निष्क्रीयता आल्याने फक्त प्रसिद्धीने कार्यकर्ता दौडती लाश होऊन जातो .असा मार्मिक उपदेशही मुल्लांजींनी केला.आभार प्रदर्शन जनमत प्रतिष्ठानच्या कर्तव्यदक्ष सचिव हर्षाली पाटील यांनी केले .







