खुलताबादचे तहसीलदार सुरेंद्र देशमुख दोन किलोमीटर पायी चालत थेट शेतकऱ्यांच्या बांधावर

khultabad-tahsildar

खुलताबाद (प्रतिनिधी सलमान खान) – खुलताबाद तालुक्यातील टाकळी राजेराय व लामंणगावं सरकारी शिवरस्ता लामणगावं येथील एका शेतकऱ्यांनी अडावला होता मागच्या काही महिन्यापासून या रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या शेकडो शेतकऱ्यांनी रस्ता अडवल्याची तक्रार तहसील कार्यालयात दिल्या होत्या मात्र तलाठी मंडळधिकारी यांनी स्थळ पाहणी करून रस्ता अडवल्याचा पंचनामा अहवाल तहसील कार्यालयात सादर केला होता मात्र या पंधरवड्यात एका शेतकऱ्यांची पत्नीचा मृत्यू झाला आणि रस्ता नसल्याने त्याची अंत्यविधी रात्री दोन वाजता झाली असल्याने या परिसरातील शेकडो शेतकऱ्यांनी पुन्हा खुलताबाद तहसील कार्यालयात जाऊन तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांना प्रत्यक्षात भेटून आपली कैफियत मंडली होती.

 

तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांनी स्थळ पाहणी करण्याची तारीख ठरवून काल दिनांक ९ डिसेंबर रोजी दोन किलोमीटर पायी चालून टाकळी राजेराय व लामंनगावं सरकारी शिव रस्त्याची पाहणी करून गैरअर्जदार यांना रस्ता मोकळा करून देण्याचा सूचना दिल्या मात्र गैरअर्जदार यांनी तहसीलदार यांना उलट सुलट व अरेरावीची भाषेचा वापर केला मात्र तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांनी समजवण्याचाच प्रयत्न केला मात्र गैरअर्जदार यांची ऐकूणघेण्याची मनस्थिती नसल्याने तहसीलदार यांनी मंडळधिकारी सोनवणे, तलाठी गोरे, तलाठी कुबेर यांना सदरील घटनास्थळीचा पंचनामा करण्याचे आदेश दिले.

सदरील पंचनामामध्ये नमूद प्रमाणे सदरील शिव रस्ता अस्तित्वात असून रोजगार हमी योजना अंतर्गत या रस्त्याचे खडीकरणचे काम झालेला आहेत हा सरकारी शिव रस्त्या शेकडो कुटूंबाचा व परिसरातील कोल्हे वस्ती, कुबड्या वस्ती, वाजदरी तांडा इत्यादी लोकांचा दडनवळणाचा रस्ता आहेत सदरील हा रस्ता एका गैरअर्जदार एका व्यक्तीमुळे बंद आहेत पडला आहेत यावेळी परिसरातील शेतकरी उत्तम कोल्हे, जाविद शेख, विजय औटे, रघुनाथ कोल्हे, कडूबा कोल्हे, मजर पटेल, नजीर पटेल, राम कोल्हे, प्रमोद औटेसह तलाठी संगणकचालक अशपाक शेख, शुभम भागडेसह शेकडो शेतकरी उपस्थित होते.

 

तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांनी दोन किलोमीटर पायी चालत टाकळी राजेराय व लामणगावं सरकारी शिवरस्त्याची पाहणी केली गैरअर्जदार यांना रस्ता मोकळा करण्याचे सूचना दिल्या मात्र तहसीलदार यांना उद्धट भाषा वापरून कोण रस्ता मोकळा करतो आणि कसा करतो अश्या भाषेचा वापर तरी तहसीलदार यांनी समजवण्याचा प्रयत्न

 

“आज पर्यंत शेकडो अधिकारी बघितले मात्र या तहसीलदार सारखे अधिकारी पहिल्यांदा पाहायला मिळाले आहेत आम्ही ज्यावेळी त्यांच्या कार्यलयात गेलो त्यावेळी त्यांनी आमच्या भावना समजून घेतल्या आणि ताबडतोब घटनास्थळी येण्याची तारीख ठरवली ठरवल्याप्रमाणे घटनास्थळी दाखल होवून पंचनामा करून लवकरात लवकर रस्ता मोकळा करण्याचे आश्वासन दिले आहे.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here