खुलताबाद (प्रतिनिधी सलमान खान) – खुलताबाद तालुक्यातील वेरूळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जिप जिल्हा आरोग्य अधिकारी औरंगाबाद व तालुका आरोग्य अधिकारी खुलताबाद यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील प्रथमच पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया शिबिर संपन्न झाले.
बुधवार दि. 9 रोजी कोरोना लॉक डाऊन काळानंतरचे जिल्ह्यातील पहिलेच पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया शिबिर संपन्न झाले. या वेळी दोन पुरुषांची नसबंदी शस्त्रक्रिया करण्यात आली. शिबिराच्या यशस्वीतेसाठी वैद्यकीय अधिकारी डॉ. बलराज पांडवे, डॉ.भाग्यश्री शेळके, औ. नि. अ. शेख, एस. पी. वाघ, के. एफ. राठोड,छाया गवळी, के.पी.वासनिक, सुधाकर बोडखे, कदिर शेख, कान्होबा झाटे, रविंद्र खंडागळे, आ.पी. बनसोड यांनी परिश्रम घेतले.








