वेरूळ लेणी येथे पर्यटकांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत;
जायंट्स ग्रुप ऑफ खुलताबादचा उपक्रम.
खुलताबाद (प्रतिनिधी सलमान खान) – कोरोना महामारी मुळे गेल्या नऊ महिन्यांपासून बंद असलेली जगप्रसिद्ध वेरूळ लेणी बुधवारपासून पर्यटकांसाठी खुली झाली असून येथे कोरणा विषयक शासकीय नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात येत आहे. या वेळी जायंट्स ग्रुप ऑफ खुलताबाद च्या वतीने पर्यटकांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
गुरुवार दि.10 पासून जगप्रसिद्ध वेरूळ येथील कैलास लेणी शासकीय आदेशान्वये पर्यटकांसाठी खुली करण्यात आली असून यामुळे लेणी परिसरात असलेल्या छोट्या मोठ्या व्यावसायिकांसह पर्यटकांनी आनंदोत्सव साजरा केला.वेरूळ लेणी भेट देणाऱ्या पर्यटकांचे नागरिकांसह खुलताबाद जायंटस् ग्रुप च्या वतीने पुष्प गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.सलग नऊ महिन्यानंतर जगप्रसिद्ध वेरूळ लेणी पर्यटकांसाठी खुली करण्यात आल्याने उत्साहाचे वातावरण दिसून आले. वेरूळ लेणीला भेट देऊन महसुलात वाढ व्हावी व वेरूळ लेणी सुरक्षित असल्याची भावना पर्यटकांमध्ये जागृत व्हावी या दृष्टीने हा अनोखा उपक्रम जायंटस् ग्रुप ऑफ खुलताबादच्या वतीने राबवण्यात आला.
यावेळी जायंट्स वेलफेअर फाऊंडेशन-फेडरेशन २ब चे समन्वयक राजेंद्र चव्हाण (भावसार), युनिट डायरेक्टर दिनेश सावजी, फेडरेशन आँफीसर सुनील मरकड, खुलताबाद ग्रुपचे अध्यक्ष जफरखान पठाण , सचिव सतीश कोळी, कोषाध्यक्ष राजाभाऊ वायाळ आदी उपस्थित होते. यावेळी छत्तीसगड, आंध्रप्रदेश, गुजरात, मध्यप्रदेश, मुंबई, नागपूर, नगर, बुलढाणा, चाळीसगाव व औरंगाबाद येथील पर्यटकांचा संपर्क आला.यावेळी जायंट्स वेलफेअर फाऊंडेशन-फेडरेशन २ब चे समन्वयक राजेंद्र चव्हाण, दिनेश सावजी, सुनील मरकड, खुलताबाद ग्रुपचे अध्यक्ष जफरखान पठाण ,सतीश कोळी, राजाभाऊ वायाळ यांची उपस्थिती होती.







