जमीन विषयक कायदे व शेतकरी वर्गाचे हक्क आणि अधिकार यावर व्याख्यानमाला.

व्याख्यानमाला

मुंबई (प्रतिनिधी लक्ष्मण राजे) – नवी मुंबई सीवुड येथील समता सहकारी सामाजिक संस्था नवी मुंबई यांच्या माध्यमातून संस्थेचे अध्यक्ष व उच्च न्यायालयातील वकील चंद्रकांत निकम यांच्या विद्यमाने, संस्थेच्या प्रांगणात, एक दिवशीय, जमीन विषयक कायदे व जमीनींचा ७/१२, दस्तऐवज, शेतकरी वर्गाचे हक्क व अधिकार या विषयावर नुकतेच व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले. जमीन महसूल अभ्यासक सुनील भडेकर व वकील रंजना खोचरे यांचे मार्गदर्शन लाभले.

 

सदर व्याख्यान फेसबुक लाईव्ह व प्रत्यक्ष क्लासरूम स्वरूपात घेण्यात आले. प्रसंगी वनौषधी तज्ञ आबा रणवरे, जेष्ठ समाज सेवक भालचंद्र माने, महिंद्र कांबळे, मोहन बनसोडे, राजाराम कसाळे, शंकर कुर्ले, छाया वाळुंज, आप्पा कागिणकर आदी मान्यवर उपस्थित होते.

 

सामाजिक अंतर राखून पार पडलेल्या या कार्यक्रमात जमिनीचा ७/१२ वाचन, सन १७०० पासूनची वंशावळी, १५० वर्षांपूर्वीचे जमिनींचे दस्तऐवज, महिलांचे जमीन विषयक हक्क व अधिकार आणि भूमि अधिग्रहण, वारस तपास – वारस नोंदी, फेरफार व न्यायालयीन अपीले, माहितीचा अधिकार व दस्तऐवज आदि विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. याच कार्यक्रमांतर्गत भालचंद्र माने यांच्या वाढदिवसाप्रित्यर्थ त्यांना चंद्रकांत निकम यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिष्टचिंतन केले.अशी माहिती सुभाष हांडे देशमुख यांनी दिली.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here