पत्रकार संघाच्या कार्यकारणी निवडीसाठी खुलताबादेत आज बैठक

maharashtra-patrkar-sangh

खुलताबाद (प्रतिनिधी सलमान खान) – महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई च्या खुलताबाद तालुका शाखा कार्यकारणीची निवड करण्यासाठी शनिवार दि.12 रोजी खुलताबाद येथे पत्रकार संघाच्या सर्व सदस्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले असून या बैठकीत पत्रकार संघाच्या खुलताबाद तालुका नूतन कार्यकारणी ची घोषणा जिल्हाध्यक्ष प्रा.डॉ. प्रभू गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात येणार आहे.

 

 

खुलताबाद तालुका महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे, राज्य संघटक संजय भोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली औरंगाबाद जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ.प्रभू गोरे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रशांत क्षीरसागर, जिल्हा सचिव दीपक म्हस्के, जिल्हा संघटक विलास शिंगी, जिल्हा कोषाध्यक्ष मुकेश मुंदडा आदी मान्यवरांच्या उपस्थितीत नूतन कार्यकारणी निवड व घोषणा करण्यासाठी शनिवार रोजी सकाळी 11.30 वाजता खुलताबाद येथे बैठक आयोजित केली असून बैठकीत नूतन कार्यकारणी घोषना करून सर्वाना नियुक्तीपत्र व ओळखपत्राचे वाटप जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. प्रभु गोरे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे, तरी सर्व सदस्यांनी बैठकीसाठी आवर्जून वेळेत उपस्थित राहावे ही असे आवाहन खुलताबाद तालुका पत्रकार संघाच्या वतीने राजेंद्र बढे, शेख जमीर,सयद इरफान,संतोष करपे यांनी केले आहे. तरी तालुक्यातील सर्व पत्रकार संघाच्या सदस्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन अध्यक्षांच्यावतीने करण्यात आले आहे .

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here