राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कालही शेतकऱ्यांसोबत होता आणि यापुढेही असेल – ना.जयंत पाटील

jayant-pati

मुंबई (संपादक सुनिल पाटील) – आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त आयोजित ‘८ दशके कृतज्ञतेची’ या विशेष कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कोविड काळात आपण अनेक जिव्हाळ्याची नाती गमावली. त्यामुळे साहेबांनी वाढदिवस साजरा न करण्याचा विचार केला. मात्र राज्याच्या कानाकोपऱ्यातील गोरगरीब सामान्य कार्यकर्ते तसेच अनेक विभागातील प्रतिष्ठित माणसं यांच्यासाठी वाढदिवस साजरा करावा असा आग्रह आम्ही ठेवला आणि पवार साहेबांनी याला होकार दिला आणि हा कार्यक्रम पार पडत आहे, असे श्री. पाटील म्हणाले.

 

आज देशाच्या राजधानीच्या दारात शेतकरी बसला आहे. कृषी कायद्यांविरोधात आंदोलन होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कालही शेतकऱ्यांसोबत होता आणि यापुढेही असेल, अशी ग्वाही त्यांनी दिली. आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. आदरणीय खा. पवार साहेबांनी ८० वर्षाचा कालखंड अविरत लोकांच्या समस्या सोडविण्याचे काम केलेय. ही एक साधना आहे. पवार साहेबांनी महाराष्ट्राला आणि देशाला पुढे नेण्याचे काम केले. पुढील ५०-१०० वर्षांनी देखील भारतातील सर्व घटकांना मदत करणारा नेता म्हणून पवार साहेबांचे नाव घेतले जाईल.

 

महाराष्ट्र कुणामुळे घडला यात अनेक दिग्गजांची नाव घेता येतील यात प्रमुख नाव हे छत्रपती शिवाजी महाराजांचे आहे. पण महाराष्ट्रातील प्रमुख व्यक्तींच्या यादीत महाराष्ट्राला आकार देणारे म्हणून पवार साहेबांचे नाव घेतले तर चुकीचे ठरणार नाही. २०१९ ला झालेला चमत्कार आपण पहिला. झालेला वार अडवण्याचे काम पवार साहेबांनी केले. काही लोक म्हणाले की पवार साहेबांचा कालखंड समाप्त झाला पण ते केंद्राचा सरकारी फौजफाटा सोडून महाराष्ट्रात फिरले तर त्यांना समजेल की कोणाचा कालखंड सुरू आहे. मागच्या निवडणुकीत अनेकांनी पक्ष सोडला. मी सगळ्यांना सांगत होतो आमच्याकडे अ गेला तर ब, ब गेला तर क आहे आणि इतकंच नाही तर आमच्याकडे शरद पवार साहेबांसारखे विद्यापीठ आहे, हे पूर्णतः खरे ठरले आहे.

 

मी जलसंपदा खात्याची जबाबदारी घेताच पवार साहेबांनी फोन करून नाशिक आणि मराठवाड्यात पाणी देण्याचे काम कसं होईल याचा माहिती दे असा आदेश दिला. या कामाला आम्ही लागलोच आणि आता मी विश्वासाने सांगू शकतो की पुढील ३ वर्षात पाणी समुद्रात वाया जाणार, हे पाणी मराठवाडा भागात फिरवण्याचे काम पूर्ण होईल. त्यासोबतच वैनगंगेच्या खोऱ्यातील पाणी नळगंगेला देण्याचे काम आम्ही हाती घेतले आहे. पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त मी हा पण करतो की महाराष्ट्राचे पाण्यासाठीचे चित्र हे पुढील काळात नक्कीच बदलेले दिसेल.

पवार साहेबांकडे पाहिले तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली राज्यघटना पूर्ण झाली हा विश्वास मिळतो, असेही जयंत पाटील म्हणाले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here