कोल्हापूर (जिल्हा प्रतिनिधी नियाज जमादार) – पश्चिम बंगालमध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या ताफ्यावर विटा आणि दगडांनी हल्ला करण्यात आला. या हल्ल्याचे तीव्र पडसाद देशभरात उमटत आहेत. कोल्हापूरातील दसरा चौकात आज भाजपा व भाजपा युवा मोर्चातर्फे या घटनेचा व पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी यांच्या सरकारचा निषेध करण्यात आला.
आज (दि.१२) दसरा चौकात निषेध आंदोलन करण्यात आले. या आंदोलनावेळी विजयसिंह खाडे – पाटील भाजप युवा मोर्चा अध्यक्ष कोल्हापूर महानगर, विवेक वोरा, गिरीश साळोखे, प्रसाद मोहिते, सुमित पारखे, प्रदीप घाटगे पिटू, शाहरुख गडवाले, नाजिम आत्तार, सुनील पाटील, रोहित कारंडे, गौरव सातपुते, अमित माळी, कार्यकर्ते उपस्थित होते. हातात फलक घेऊन या हल्ल्याचा निषेध नोंदविण्यात आला.








