नायगाव (प्रतिनिधी कमल कचर कर्डक) – आज मराठी फिल्ममचे दिग्दर्शक व निर्माते. कलाकार .श्री.शिवकुमार गुणवरे यांनी आज आदिवासी समाजसेवक , साहित्यिक. नामदेव भोसले,व जेष्ठ साहित्यिक. भास्कर भोसले, यांच्यासह नायगाव येथे आई शेवराईचा आर्शीवाद घेतला.
यावेळी त्यांच्या सोबत अगोती गावचे उपसरपंच भिमराव सदाशिव शिंदे, स्टार टि.व्ही९चे संपादक महा. राज्य मराठवाडा केसरी आणि हिंदु सम्राटचे प्रथा न्युज इंडिया पुणे पत्रकार अखिल भारतीय चित्रपट निर्माता महामंडळ महा. राज्य उपाध्यक्ष सुनिल भोसले.उपस्थित होते, श्री.शिवकुमार गुणवरे यांना शेवराई भोसले व सुजाता भोसले, सुरेखा भोसले, तुकाराम भोसले,यांच्या हस्ते गुणवरे यांना एक रोप देऊन सत्कार करण्यात आले व झाडे लावा व झाडे जगवा असा संदेश दिले. 
श्री.गुणवरे पुढे म्हणाले आजचा शेवराईचा आशिर्वाद माझ्यासाठी अडचणीत योग्य वेळी संकट काळी ताकत देणारा आहे,हा आर्शीवाद म्हणजे जीवणातील सर्वात मोठा बहुमान आहे, शेवराईने आजपर्यंत गरीबीवर मात करुन आपल्या मुलांना गरीबांना न्याय देण्याचे धडे लहानपणापासूनच दिले आणि म्हणूनच आज महाराष्ट्रात महाराष्ट्र शासनचा आदर्श समाजसेवक पुरस्कार प्राप्त असलेले आदर्शसमाजसेवक नामदेव भोसले व भास्कर ,सुनिल ,यांच्या सारखे पारधी समाजात हिरे जंन्माला आले,याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे, राज्यातील प्रत्येक मातांनी शेवराईचा आदर्श घेवा असे शिवकुमार गुणवरे म्हणाले.







