मुंबई (प्रतिनिधी लक्ष्मण राजे) – भारतीय जनता पार्टीचे आमदार मंगलप्रभात लोढा यांच्या आशीर्वादाने भारतीय जनता पार्टी दक्षिण मध्य मुंबई जिल्हा अध्यक्ष राजेश शिरवडकर यांच्या मार्गदर्शनाखाली नितीन सुमती चंद्रकांत कदम यांची भारतीय जनता पार्टी दक्षिण मध्य मुंबई कार्यालयात भारतीय जनता पार्टी दक्षिण मध्य मुंबई सहकार आघाडी जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.
यावेळी नीरज उभारे महामंत्री दक्षिण मध्य मुंबई, गजेंद्र धुमाळे उपाध्यक्ष दक्षिण मध्य मुंबई, श्रीनिवास शुक्ला महामंत्री दक्षिण मध्य मुंबई प्रभारी वडाळा विधानसभा , अमोल गायकवाड अध्यक्ष युवा मोर्चा आदी मान्यवर उपस्थित होते. 
तसेच नितीन सुमती चंद्रकांत कदम यांनी कार्यसम्राट आमदार कालिदास कोळंबकर यांची सदिच्छा भेट घेऊन आशिर्वाद घेतले. भारतीय जनता पार्टी दक्षिण मध्य मुंबई सहकार जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्यावर राजकीय , सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी, आणि कार्यकर्त्यांनी नितीन सुमती चंद्रकांत कदम यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या.








