कोविड बॉडी दहन करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा कोरोनायोध्दा प्रमाणपत्र देऊन सन्मान

kovid-yodhya

ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशनतर्फे, वागळे इस्टेट येथील, स्मशान भूमीत दिवस-रात्र कोविड बॉडी दहन करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा कोरोना योध्दा सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी महाराष्ट्र पोलीस बॉईज असोशियनचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष सिद्धार्थ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच , वागळे इस्टेट पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजय मुतडक, कार्यसम्राट स्थानिक नगरसेवक एकनाथ भोईर व महाराष्ट्र पोलीस बॉईज असोशियनचे ठाणे शहराध्यक्ष सतीश बनसोडे, महिला आघाडी ठाणे शहराध्यक्ष ॲड.तृप्ती महेश पाटील यांच्या हस्ते हे सन्मानपत्र येथील कर्मचारी व अधिकारी यांना देण्यात आले.

kovid-yodhya-sanman

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here