कबचौ बहिणाबाई विद्यापीठाचा अजून एक प्रताप : प्रथम वर्ष कला शाखेच्या इंग्रजीच्या पुस्तकातील वाङमयचौर्य झाले उघड

वाङमयचौर्य करणाऱ्या प्राध्यापकावर कारवाई राष्ट्रवादीचे सचिव
अँड कुणाल पवार यांनी एका पत्रकाद्वारे केले आवाहन

जळगाव (संपादक सुनिल पाटील) – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील लपवाछपवीचा पुन्हा एक नमुना समोर आलेला आहे. गेल्या चार पाच वर्षांपासुन जळगाव विद्यापीठामध्ये काही विशेष लोकांसाठी व त्यांच्या दबावाखाली विद्यापीठ प्रशासन काम करित असल्याची अनेक उदाहरण याआधी उघड झालेली आहेतच. यामाध्यमातुन विद्यापीठाचे कुलगुरु व त्यांचे बहुतेक अधिकारी हे त्यांचे अधिकार विसरुन फक्त आपआपला कार्यकाळ पुर्णत्वाकडे नेण्यातच धन्यता मानतांना दिसत आहेत.

नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार विद्यापीठामध्ये इंग्रजी अभ्यास मंडळासह अनेक समितींवर कार्यरत असलेले डॉ.अविनाश बडगुजर, नुतन मराठा महाविद्यालय, जळगाव यांनी कला शाखेच्या प्रथम वर्षाचे इंग्रजीचे पुस्तक “Reading Literature” हे संकलीत व प्रकाशीत केले. मात्र हे पुस्तक वाचल्यानंतर, त्यांनी बिनबोभाटपणे वाङमयचौर्य केल्याचे स्पष्ट होत आहे.

यासंबंधी अधिक माहिती घेतली असता असे समजते कि, डॉ.अविनाश बडगुजर यांनी “Literary Forms, Trends and Movements (Rama Brothers) या पुस्तकातुन पान क्र. 28 ते 41 हि पाने जशीच्या तशी कॉपी पेस्ट केलेली आहेत. तसेच इतरही अनेक पानेची पाने इंटरनेटवरुन उचललेली दिसतात.
कुलगुरुंकडे या सर्व प्रकरणाची तक्रार केली गेली असुन त्यासंदर्भात एक तज्ञ चौकशी समितीसुध्दा गठीत झाल्याचे सुत्रांकडून कळाले. परंतु विद्यापीठाच्या सध्याच्या कार्यपध्दतीनुसार फक्त समिती नेमली गेली आहे परंतु गेल्या आठ महिन्यांपासून कोवीडचे कारण पुढे करुन या समितीचे प्रत्यक्ष कामकाजच अजुन सुरुच झाले नसल्याचे समजते. कुलगुरू शेतकरी यांचे कोर्टात पैसे भरण्याचे त्यंच्या कुलसचिव मार्फत कोर्टात पंधरा दिवसासाठी भरण्याचे हो म्हणतात आणि नंतर त्यावर एका आरोपी असलेल्या व्यक्तीची तीन सदस्यीय समिती बेकायदेशीरपणे कोर्टाच्या आदेशाचा अवमान करण्यासाठी नेमतात व ती समिती लॉकडाऊनमध्येपण काम करते आणि ह्या प्रकरणात कायदेशीर कारवाई करण्यासाठी दबावाला बळी पडून टाळत आहे म्हणजेच काही तरी आर्थिक हितसंबंध जोपासण्याचा किवा पदाचा दुरुपयोग सुरू असल्याने असे घडत आहे

डॉ.अविनाश बडगुजर हे स्वतः पीएच.डी.धारक असुन ते इंग्रजी विषयामध्ये पीएच.डी.चे मार्गदर्शकसुध्दा आहेत. मात्र विद्याचवाचस्पतीसारख्या सर्वोच्च पदवीचे मार्गदर्शकच जर वाङमयचौर्य करीत असतील तर त्यांचे स्वतःचे संशोधन व त्यांचे मार्गदर्शनाखाली होणारे इंग्रजी भाषा व साहित्याचे संशोधन यावर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहते. अशा शिक्षकांचा व मार्गदर्शकांचा त्यांचे विद्यार्थी काय धडा घेणार व संशोधनाचा काय दर्जा राखल्या जाणार असे अनेक प्रश्न यानिमित्ताने निर्माण होतात.
वाङमयचौर्यासारख्या गंभीर बाबीची चौकशीही संबधीत दोन पुस्तकांचा अभ्यास करुन आॉनलाईन पध्दतीनेसुध्दा अहवाल सादर केला जाऊ शकतो व पुढील कार्यवाही विद्यापीठाला करता येते. मात्र या सर्व बाबी प्रशासनाच्या व प्रशासन चालविणाऱ्या अधिकाऱ्यांच्या इच्छाशक्तीवर व कार्यक्षमतेवर अवलंबून असल्याने या वाङमयचौर्याचासुध्दा विद्यापीठाच्या इतर अनेक घोटाळ्यांसारखा पर्दाफाश होईल का नाही याबाबत सर्वंनाच शंका वाटत आहे. तसेच अश्या प्रकारचे गंभीर आरोप असणाऱ्या मार्गदर्शक यांच्या मार्गदर्शनाखाली होत असलेल्या सर्व पीएच.डी.च्या पदव्या रद्द करण्यात याव्यात अशा अनेक घोटाळ्यांकडे व विद्यापीठाचा दर्जा ढासळविणाऱ्या घटनांकडे डोळेझाक करून कुलगुरु कधीपर्यंत आपल्या पदाचे लोणी खात राहणार आहेत याचा तरी खुलासा कुलगुरू यांनी करावा असे आवाहन राष्ट्रवादीचे सचिव अँड कुणाल पवार यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.

Document 19

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here