खुलताबाद तालुक्यातील निरगुडी बुद्रुक शिवारात आढळून आले वयोवृद्ध महिलेचे प्रेत

death-body

खुलताबाद (प्रतिनिधी सलमान खान) – खुलताबाद तालुक्यातील निरगुडी बुद्रुक शिवारातील व म्हैसमाळ डोंगर पायथ्याला गोरक्षनाथ मंदिरापासून पासून काही अंतरावर एका महिलेचे प्रेत छिन्नविछिन्न अवस्थेत दुपारी चार वाजेच्या सुमारास आढळून आल्याने पिंपरी व निरगुडी गावात खळबळ उडाली असून या महिलेचा मृत्यू बिबट्याचा हल्ल्या मुळे झाला कि, कशामुळे झाला या बाबत परिसरात उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे.

याबाबत मयत वयवृथ महिलेच्या वृनातेवाईक यांचे कडून मिळालेली अधिक माहिती अशी, पिंपरी येथील महिला तीन दिवसापूर्वी घरातून दर्शनासाठी जाते म्हणून घरा बाहेर गेली होती, तीन दिवस झाले तरी महिला घरी न परतल्यामुळे तिची मुलगी व नातेवाईकांनी तिचा आसपास परिसरात शोध घेतला असता सदर महिला निरगुडी बुद्रुक शिवारातील गट क्रमांक 43 मध्ये मृतावस्थेत आढळून आली, व प्रेत छिन्नविछिन्न अवस्थेत पडलेले होते, मयत झालेल्या महिलेचे नाव नवसाबाई ढवळूसिंग घुनावत वय 80 वर्ष असून महिला पिंपरी गावाची रहिवाशी आहे.

महिलेचे प्रेत आढळले ही बातमी वाऱ्यासारखी पिंपरी व निरगुडी गावात पसरली तेव्हा येथील काही नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली तसेच पोलीस पाटील व पोलीस स्टेशनला फोन करून कळवण्यात आले असता पोलीस निरीक्षक सीताराम मेहत्रे, बीट जमादार राम छत्रे, वाल्मीक कांबळे यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. वन विभागाचे कर्मचारीही घटनास्थळी दाखल झाले होते. खुलताबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली असून अधिक पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here