महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या राहुल दुबाले यांची राज्यपालांशी भेट

rahul-dubale

पोलीस अधिकारी कर्मचारी आणि त्यांच्या परिवाराच्या अडचणी मांडल्या

बीड (विशेष प्रतिनिधी) – आज (दि.१४) मा. राज्यपाल भगतसिंग कोशारी साहेब यांची संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना तथा मा.महाराष्ट्र शासन गृह विभाग पोलीस निराकरण समन्वय समिती सदस्य राहुल दूबाले यांनी राजभवन येथे भेट घेतली.

 

यावेळी झालेल्या चर्चेत दुर्लक्षित झालेल्या पोलीस अधिकारी कर्मचारी आणि त्यांच्या परिवाराच्या अडचणी मांडल्या शिक्षण, संरक्षण, आरोग्य, रोजगार आणि निवारा या मूलभूत गोष्टींवर सविस्तर चर्चा केली. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी पोलीस परिवारासंबधी आपुलकी व्यक्त करतांनाच महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या कामाचे कौतुक केले.
यावेळी बोलतांना ते म्हणाले की, मी कायम पोलिसांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करेल महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना यापुढेही अशीच चांगली कामे करत रहा. पोलीस बॉईज संघटनेच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here