गुगल सेवेला जगभरात पाऊणतास फटका

google

नवी दिल्ली – आज गुगलच्या सेवेला फटका बसला आहे. जगभरातील गुगलची सेवा बाधित झाल्याचे दिसले आहे. सायंकाळी ५.२० वाजता गुगलची जीमेल सेवा आणि हँगआउट सह अनेक सेवामध्ये एरर (Gmail-Youtube Down) पेज पाहायला मिळाले. जवळपास ४५ मिनिटे विस्कळीत झालेली सेवा ६.५ वाजता पूर्वपदावर आली. यूट्यूबवर सुद्धा ही समस्या उद्भवली आहे. तसेच गुगल सर्च इंजिन म्हणजेच google.com मात्र व्यवस्थित सुरू असल्याचे दिसत आहे. गुगलच्या या सेवेला कशामुळे फटका बसला याचे कारण, अद्याप समोर आले नाही.

 

जर तुम्ही यूट्यूब उघडण्याचा प्रयत्न केला तर यूट्यूब उघडणार नाही. परंतु, जर विना लॉगिन यू्ट्यूब उघडला तर यूट्यूब चांगले काम करीत आहे. त्यामुळे असा संशय व्यक्त केला जात आहे की, गुगल लॉगिन सिस्टम काम करीत नाही. ट्विटर वर याला काही लोकांनी शेयर केले आहे.

 

गुगलची सेवा केवळ भारतात बंद झाली नाही तर संपूर्ण जगभरातून या संबंधीची तक्रार येत आहे. अमेरिकेच्या कॅलिफोर्निया मध्ये सुद्धा अशीच समस्या येत आहे. याआधी २५ सप्टेंबर रोजी अमेरिकेत जीमेल सह गुगलची काही सेवा बाधित झाली होती.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here