शहादा (प्रतिनिधी विजय निकम) – शनिवार दिनांक 12 डिसेंबर 2020 रोजी मुख्यमंत्री पक्षप्रमुख ऊध्दव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख बबनरावजी थोरात तसेच जिल्हा प्रमुख विक्रांतजी मोरे यांचा मार्गदर्शनाखाली केंद्रसरकारच्या अन्यायी कृषी कायद्याविरोधात देशव्यापी सुरु असलेल्या आंदोलनात सहभागी शेतकरी बांधवांना केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी पाकिस्तान, चीन पुरस्कृत असल्याचे संबोधून शेतकरी बांधवांचा घोर अपमान केला आहे. पर्यायाने देशातील सर्वसामान्य नागरीकांचाही घोर अपमान केला आहे. मागेही महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना साले संबोधुन शिविगाळ करण्याची मजल गेली होती.त्यामुळे ह्या मस्तवाल केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी आज शहादा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ तीव्र आंदोलन करुन रावसाहेब दानवे आणी केंद्रसरकारचा निषेध करण्यात आला.
कोरोना महामारीत संपुर्ण देश मेटाकुटीला आला असतांना आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाचे भाव कमी असतांनाही मोदी सरकारने इंधनाचे दर कमी करण्याचे सोडून उलट वाढवुन भांडवलदारांचच हित जोपासले या विरोधातही आंदोलन करण्यात आले आणि अन्यायी दरवाढ कमी करण्याची मागणी करण्यात आली.
याप्रसंगी माजी जिल्हाप्रमुख अरुणआप्पा चौधरी,उपजिल्हाप्रमुख सखारामजी मोते,उपजिल्हा संघटक मधुकर मिस्तरी,शहरप्रमुख रोहन माळी, ता.संघटक भगवान अलकरी, शहर संघटक गणेश चित्रकथे,ता.उपप्रमुख उत्तम पाटील, डॉ. सागर पाटील, बापू सुर्यवंशी, माजी नगरसेवक विनोद चौधरी, माजी शहरप्रमुख बापु चौधरी, दिलिप पाटील, सुरेश मोरे,उपशहरप्रमुख गुलाब सुतार, प्रविण सैंदाने, बिपिन सोनार,ईद्रिस मेमन,उपसरपंच चुडामन पाटील, विनोद पाटील, राहुल चौधरी, नाना बिरारे,प्रशांत नायक,प्रकाश शिरसाठ, वसिम अंसारी,अशोक ईशी,विवेक भावसार,निलेश पाटील,रूषिकेश शिवदे,अक्षय वाडिले,तौसिफ खान,अशफाक काझी,राजेश भावसार, सुदाम लोहार, सतिश पाटील, लहु बागले,आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.







