चैन्नई- दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील नावाजलेली स्टार अनुष्का शेट्टी हिने अलिकडेच एका मंदिराला भेट दिली. या प्रवासादरम्यानचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. करोना काळात अनुष्का सार्वजनिक ठिकाणी दिसली नव्हती. यासोबतच ती सोशल मीडियावर फारशी सक्रिय नसल्याने तिच्या संबंधीचे फोटो- व्हिडिओही चाहत्यांना पाहता येत नव्हते. पण आता एका पूजेसाठी अनुष्का बाहेर पडली असून पटकन तिला ओळखताही येत नाही.
अनुष्का शेट्टीचा एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ती होडीत बसलेली दिसत आहे. तिनेने रुमालाने आपला चेहरा झाकला होता. मीडिया रिपोर्टनुसार, अनुष्का पश्चिम गोदावरीच्या पोलावरम येथे वीरभद्र स्वामींची पूजा करण्यासाठी गेली होती. व्हिडिओमध्ये ती फोटो काढताना आणि मित्रांशी बोलताना दिसत आहे.
పట్టిసీమ ప్రాంతంలో ఉన్న నందీశ్వర స్వామి దేవాలయం సందర్శించి స్వామి వారిని దర్శించుకున్న అనుష్క శెట్టి. #AnushkaShetty #NandeeswaraSwamyTemple pic.twitter.com/LHOkIvJTol
— Rajesh Manne (@rajeshmanne1) December 9, 2020







