शिरपूर (विशेष प्रतिनिधी) – शिरपूर तालुक्याचे नव्हे तर संपूर्ण खान्देशचे नेते, माजी शालेयमंत्री अमरिशभाई पटेल यांची आमदार म्हणून धुळे नंदुरबार विधान परिषदेच्या निवडणुकीत प्रचंड मताधिक्याने विजयी झाल्याबद्दल मुंबई येथील प्रसिद्ध मिठीबाई काॅलेज येथे भारतीय पत्रकार संघाच्या वतीने अभिनंदन व सत्कार करण्यात आला.
यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष विक्रमजी सेन, महाराष्ट्राचे अध्यक्ष एम एस शेख, उपाध्यक्ष गोपाल मारवाडी, तालुकाध्यक्ष युवराज माळी, शहराध्यक्ष राजु मारवाडी, संघटक मंगेश माळी आदी उपस्थित होते.







