नाशिक (विशेष प्रतिनिधी इंजि कुबेर जाधव) – आज दिनांक १४.१२.२०२० रोजी विकेल ते पिकेल धोरणांतर्गत संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार अभियान राबविणे बाबत देवळा तालुक्यात तालुकास्तरीय समितीची दत्तात्रेय शेजुळ तहसिलदार यांच्या अध्यक्षतेखाली तालुका स्तरीय समितीची सभा आयोजित करण्यात आली होती.
या सभेमध्ये सचिन देवरे तालुका कृषि अधिकारी मार्गदर्शक सूचनांचे वाचन करून सविस्तर माहिती दिली. बैठकीत बाजारामध्ये शेतक-यांच्या मालाला चांगला भाव ,ग्राहाकांना ताजी फळे व भाजीपाला वाजगवी दरात उपल्बध होईल अशी संकल्पना सुरु करावी यासाठी संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार अभियान सुरुवात करुन शेतकरी ते ग्राहक थेट विक्रि व्यवस्था व त्यासंबंधी मुल्य साखळी संबंधित नियोजन करण्यात आले, त्यासाठी तालुक्यातील शेतमाल उत्पादक शेतक-यांना गट आत्मा /शेतकरी कंपनी याव्दारे विक्रिसाठी जोडण्यात येणार आहे. तालुक्यातील गृह निर्माण सोसायटी पदाधिकारी, विक्रिसाठी योग्य स्थळ निश्चित करुन शेतक-यांना जागा उपलब्ध करुन विक्रि स्टॉल कार्यान्वित करण्याचे धोरण निश्चित केले, शेतकरी गटास टेबल खुर्ची ,पोलडेबल रॅक, वजन काटा इत्यादी सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी नियोजन केले या विषयावर चर्चा करण्यात आली.
या सभेस श्री देशमुख गट विकास अधिकारी, प्रशांत पवार कृषि अधिकारी ,रुपेश खेडकर के.व्ही.के.वडेल कुबेर जाधव, विनोद देवरे, निवृती देवरे, भरत सांवत, कृषि उत्पन्न बाजार समिती श्री निकम, श्री जाधव, श्री वाघ, मंडळ कृषि अधिकारी आदी तालुस्तरीय सदस्य उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळावा यासाठी प्रयत्नशील राहणार
विकेल तेच पिकेल या धोरणा अंतर्गत संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार अभियानातंर्गत कृषी व पणन विभागाच्या समन्वयाने शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळावा, ग्राहकांना ताजा भाजीपाला मिळावा, ठराविक रस्त्यांलगतच्या गावातील शेतकऱ्यांचा शेतीमाल, भाजीपाला विकण्याची व्यवस्था, त्यासाठी त्यांना निवारा, छत्र्या, वजनकाटे, टेबल खुर्च्या, पाणी उपलब्ध करून देण्यात यावे, यासाठी गठीत करण्यात आलेल्या शेतकरी समन्वय समिती व सामाजिक, सहकारी संस्थांचे सहकार्य व मार्गदर्शन घेण्यात येणार आहे.
– कुबेर जाधव, समन्ववयक (कृषी) देवळा तालुका.







