मुंबई (प्रतिनिधी प्राजक्ता अरूण चव्हाण) – महाराष्ट्र नवनिर्माण माथाडी कामगार सेना. मनसेचा नामफलक उद्घाटन सोहळा हा मनसे नेते शिरीष सावंत यांच्या उपस्थितीत व माथाडी कामगार सेना अध्यक्ष अरविंद गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली संयुक्त सरचिटणीस महेंद्र जाधव यांनी फलक अनावरण करून व श्रीफळ वाढवून हा सोहळा वॉर्ड क्रमांक १५७ संघर्ष नगर , चांदीवली, सकिनाका येथे पार पडला. आयोजक साकीनाका चांदिवली चिटणीस सिध्देश खानविलकर, उपचिटणीस -शाहिद शेख उपचिटणीस – राजु कोळी यांच्या प्रयत्नाने माथाडी कामगार सेनेचा नामफलक लावण्यात आला.
या प्रसंगी अंधेरी चिटणीस प्रमोद वैजल उपचिटणीस महेंद्र अहिरे सायन चिटणीस – दिलीप विचारे . स्थानिक विभाग अध्यक्ष महेंद्र भानुशाली, महिला पदअधिकारी, शाखा अध्यक्ष .उपशाखा अध्यक्ष . माथाडी कामगार , कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.







