शिंदखेडा (प्रतिनिधी) – वंदनीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या आर्शिवादाने, महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आदेशाने, उत्तर महाराष्ट्राचे संपर्क नेते खासदार संजय राऊत, उत्तर महाराष्ट्राचे समन्वयक रविंद्र मिर्लेकर, संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांच्या मार्गदर्शनाने तसेच शिवसेनेचे धुळे ग्रामीणचे जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके यांच्या शिफारशीनुसार शिवसेनेचे हिरालाल जगन्नाथ बोरसे यांची शिवसेना प्रणित स्थानिय लोकाधिकार समिती, धुळे जिल्हा (ग्रामीण) च्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यांत आली. तसेच त्यांच्या हातून कामगार, शेतकरी, शेतमजुर, सर्व सामान्यांची सेवा घडावी, संपुर्ण धुळे जिल्हा (ग्रामीण) मध्ये स्थानिय लोकाधिकार समितीचे संघटन उभे करावे, अशी अपेक्षा श्री.साळुंके यांनी व्यक्त करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी श्री.बोरसे यांचा पुष्पहार व शाल देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके, जिल्हा संघटक मंगेश पवार, तालुका प्रमुख गिरीश देसले, उपतालुकाप्रमुख संतोष देसले, शहरप्रमुख सागर देसले, हातनुरचे माजी सरपंच प्रा.ए.व्ही.पाटील, रमेश बोरसे, पं.स.सदस्य भगवान पिंपळे, युवासेनेचे गणेश परदेशी, प्रदीप पवार, मनोज पवार, बन्सीलाल पाटील, ॲड.वसंत पाटील, नेवाडेचे सरपंच लक्ष्मीकांत साळुंके, संदीप निकम, भुषण पाटील, हेमंत सैंदाणे, दिपक बोरसे, सुकदेव बागुल, स्वीय सहाय्यक दिपक जगताप, स्वीय सहाय्यक रुपेश मराठे आदी उपस्थित होते.







