राज्याध्यक्ष यांची औरंगाबाद शिक्षक समितीस भेट व मार्गदर्शन
खुलताबाद (प्रतिनिधी सलमान खान) – दिनांक 17 डिसेंबर 2020 रोजी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष माननीय उदयजी शिंदे व सातारा शिक्षक बँकेचे संचालक माननीय किरणजी यादव हे औरंगाबाद विभाग दौर्यावर आले असता, औरंगाबाद जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीच्या पदाधिकाऱ्यांना कँनाट गार्डन सिडको,येथे मार्गदर्शन केले. . यावेळी राज्याध्यक्ष श्री उदयजी शिंदे यांनी शिक्षक समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांची भेट घेऊन चर्चा करत, शिक्षकांच्या प्रश्नांबाबत राज्यस्तरावर चालू असलेली कार्यवाही व संघटना बांधणी,DCPS,अशंदान योजना, याबाबत मार्गदर्शन केले .
यावेळी शिक्षक समितीचे खंदे कार्यकर्ते राज्य सहसचिव श्री.नितीनजी नवले यांच्या कनेच्या विवाहातही हजेरी लावली.लग्नात माजी विधानसभा अध्यक्ष मा.श्री. हरीभाऊ बागडे (नाना) यांच्याशी विवीध विषयावर चर्चा केली. माननीय राज्याध्यक्ष आणि सातारा शिक्षक बँकेचे संचालक यांचे औरंगाबाद जिल्हा शिक्षक समितीच्या वतीने यथोचित स्वागत करण्यात आले.
यावेळी औरंगाबाद जिल्हाध्यक्ष विजय साळकर जिल्हा सरचिटणीस रंजीत राठोड,जिल्हा प्रसिध्दीप्रमुख सतिश कोळी,पैठण शिक्षक समितीचे नेते अशोक डोळस,औरंगाबाद तालुका शिक्षक समितीचे कोषाध्यक्ष विलास चव्हाण राजेंद्र वाघमारे,जेष्ठ नेते भाऊसाहेब बोर्डे,जिल्हा उपाध्यक्ष अंकुश वाहूळ/ चंदू लोखंडे,विष्णू भंडारे,मोहंमद गौस,राजू ठाकुर,बबन थोरे,के.के.जंगले,लक्ष्मीकांत धाटबळे,रऊफ पठाण,राजेंद्र नागे पाटील,(पैठण तालुक्याचे नेते) कडूबा साळवे, के.डी.मगर, अर्जुन पिवळ,कैलास ढेपले,प्रकाश जायभाये,पंजाबराव देशमुख,दत्ता खाडे,जे.के.देशमुख,पंकज सोनवणे,सुनील बोरसे,सह शिक्षक समितीचे शिक्षकवृंद उपस्थित होते .







