मुंबई (प्रतिनिधी लक्ष्मण राजे) – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश चित्रपट, साहित्य, कला आणि सांस्कृतिक विभागाच्या ठाणे जिल्हा अध्यक्ष व प्रदेश सचिव पदी अभिनेत्री मेघा घाडगे यांची निवड करण्यात आली. तसेच गायक प्रविण कदम यांची ठाणे जिल्हा उपाध्यक्ष पदी आणि मंगेश मोरे यांची पुणे विभागात निवड करण्यात आली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरदचंद्रजी पवार, उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार , यांच्या मार्गदर्शनाखाली आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रियाताई सुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंतराव पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाराष्ट्र राज्य चित्रपट, साहित्य, कला, सांस्कृतिक विभागाचे अध्यक्ष बाबा पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मेघा घाडगे , प्रविण कदम , आणि मंगेश मोरे या निवड झालेल्या कलाकारांना नियुक्ती पत्र प्रदान केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अनेक मान्यवरांनी , कार्यकर्त्यांनी आणि कलाकारांनी मेघा घाडगे, प्रविण कदम, आणि मंगेश मोरे यांना निवड झाल्याबद्दल अभिनंदनीय शुभेच्छा दिल्या.







