पिफ्फ व अ. भा.मराठी चित्रपट महामंडळाकडून खुशखबर

pune-film-festival

मुंबई (उपसंपादक दिलीप दळवी) – १९ व्या पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल -२०२१ च्या मराठी चित्रपट स्पर्ध्येच्या प्रवेशिका स्विकारण्यास सुरवात झाली आहे. पिफ्फ फक्त या वर्षाकरीता सन २०२० मध्ये सेन्सॉर मिळालेल्या आणि सेन्सॉर न मिळालेल्या अश्या दोन्ही प्रकारच्या मराठी चित्रपटांना सहभागी होण्याची मुभा देत आहे. प्रवेश अर्ज 2 DVDs किंवा Vimeo लिंक password सहित पाठवण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०२० सायं. ६ वाजेपर्यंत आहे.

 

निर्मात्यांनी चित्रपटाचे शिर्षक आणि संस्था हे अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळात नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. १ जानेवारी ते ३१डिसेंबर २०२० या कालावधीतच सिनेमा पूर्ण केला आहे आणि त्याचे कसलेही पोस्ट-प्रोडक्शन चे काम बाकी नाही. संबंधित चित्रपटाची निर्मिती ही सन २०२० मध्येच झाली आहे याची लॅब अथवा स्टुडीओ चे पूर्ततापत्र सादर करून व त्याची DCP प्रिंट दाखवण्यास तयार आहे हे प्रमाणित करतो. .महोत्सवाने व महामंडळाने घातलेले नियम चित्रपटांचे निर्माते, दिग्दर्शक काटेकोरपणे पाळतील. सदर प्रमाणपत्र फक्त १९ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाकरीताच ग्राह्य धरू.या बाबींची पूर्तता  करणे आवश्यक आहे

 

सर्व कागदपत्रे “पिफ ऑफिस” पुणे येथे त्वरित जमा करावे. अधिक माहितीसाठी विशाल शिंदे-9011133111, http://Email- [email protected] यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन विशाल पवार -9833360633 यांनी केले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here