शिक्षक भरतीत बेकायदेशीररित्या ५० टक्के मागासवर्गीय कपात, आरक्षण अबाधित राहण्यासाठी एकदिवसीय लाक्षणिक उपोषण

mumbai-uposhan

मुंबई (प्रतिनिधी प्राजक्ता अरूण चव्हाण) – आझाद मैदान, मुंबई येथे १५ डिसेंबर २०२० रोजी शिक्षक भरती कृती समिती आणि मागासवर्गीय विद्यार्थी कृती समिती यांच्या वतीने एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. २०१० नंतर २०१७ साली तत्कालीन राज्य सरकारने शिक्षक भरती करण्याचा निर्णय घेतला खरा पण बेकायदेशीररित्या त्यातली ओबीसीसह मागसवर्गीयांची ५० टक्के पदांची (सुमारे पाच हजार पद) कपात करण्यात आली. ही रिक्त पदे याच भरतीत भरण्यात यावी व पवित्र पोर्टलद्वारे रखडलेली भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी यासाठी शिक्षक भरती कृती समिती व मागासवर्गीय विद्यार्थी कृती समितीच्या वतीने फेब्रुवारी २०२० मध्ये बेमुदत उपोषण करण्यात आले होते.

 

फेब्रुवारी मध्ये ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सदर मागासवर्गीयांची कपात केलेली पदे आठ दिवसात भरण्यात यावी असे लेखी आदेश दिले होते. काँग्रेस प्रवक्ते अँड. राजू वाघमारे यांच्या मध्यस्थीने उपोषण सोडवण्यात आले होते. नंतर मे २०२० मध्ये काही अभिधारकांनी पायी दिंडी काढली होती. तेव्हा पवित्रपोर्टलद्वारे थांबलेली भरती प्रक्रिया पुन्हा सुरु झाली खरी पण ५० टक्के कपात ठेऊन, पुढची यादी लावा असे काही जणांचे म्हणणे होते. परंतु आधीचे ५० टक्के आणि आत्ताचे असे एकंदरित भरती करावी. कारण तो गरीब पात्रता योग्य अभिधारकांचा हक्कच आहे. हे आदेश दहा महीने निघुन गेले तरी, ओबीसी, मागासवर्गीय यांच्यावरील अन्याय दूर केला गेलेला नाही. राज्यभरातील मागासवर्गीय अभियोग्यता धारक यांनी एकदिवसीय लाक्षणिक उपोषणात सहभागी होऊन प्रक्रिया सुरळीत करावी आणि ही कपात रद्द करून, यावेळी एकंदरित मागासवर्गीय, ओबीसी पदे भरावीत, एम. पी. एस. सी. च्या परीक्षा आणि सरळ सेवा भरती तात्काळ सुरु करण्यात यावी. यासाठी राज्य सरकारला आव्हान करण्यात आले आहे.

 

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आंदोलनस्थळी येऊन मागासवर्गीय विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यात येईल असे आश्वासन दिले. यावेळी ओबीसी नेते प्रकाशअण्णा शेंडगे, अँड. मंगेश ससाणे, अजय मुंढे उपस्थित होते. मागासवर्गीय अभियोग्यता धारकांच्या वतीने दत्ता नागरे यांनी आपली व्यथा प्रवीण दरेकर यांना समजावून सांगितली. राहुल खरात, आबा माळी, अजय भवर, श्रीकांत पाखरे, अदिती मुंडे, मनीषा काटे, उमा कांबळे, अर्चना सोनावणे, गजानन बहिवाळ यांच्यासह अजुन अभियोग्यता धारक यांची हजेरी लावली होती. प्रकाशअण्णा शेंडगे यांनी “मागासवर्गीयांच्या जागा लवकरात लवकर भरल्या गेल्या नाही तर मंत्रालयाला घेराव घालून तीव्र आंदोलन” करण्याचा इशारा यावेळी दिला.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here