मुंबई (प्रतिनिधी लक्ष्मण राजे) – संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या ७५१ व्या जयंती वर्षाची सुरुवात नामदेव समाजोन्नती परिषद, पुणे शहर संस्थेने दि. १३ डिसेंबर २०२० रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे विद्याचे माहेर घरात कुलपती महामहीम राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे शुभहस्ते तर प्रमुख पाहुणे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर व उपकुलगुरू डाॅ. एन. एस. उमराणी व शिख समाजाचे नेते संत सिंग मोखा यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
याप्रसंगी नामदेव अध्यापन प्रमुख डाॅ. सदानंद मोरे सर, श्री. राजेश पांडे सर, कुलसचिव मा. डाॅ. प्रफुल्ल पवार सर, संजय नहार, मा. आ. रामदास फुटाणे, डाॅ. अशोक कामत, परिषदेचे सरचिटणीस डाॅ. अजय फुटाणे यांचे सह नामदेव समाजोन्नती परिषद, ना.स.प पुणे शहर, पुणे, पिंपरी, चिंचवड शहरातील शहरातील ज्ञातीसंस्थाचे प्रमुख पदाधिकारी, विद्यापीठातील सर्व विभाग प्रमुख, अधिकारी, कर्मचारी व यांच्यासह पुणे शहरातील निमंत्रित उपस्थित होते.
पुणे शहरातील सर्व ज्ञातीसंस्था व सर्व जिल्ह्यात याच्या प्रती पोहचवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.विशेषांकाची मुळ संकल्पना प्रशांत सातपुते व संदिप लचके यांची असून कै. सुधीरदादा पिसे व संजय नेवासकर यांनी मार्गदर्शन केले. तर संपादक सुभाष मुळे असून याकरिता ना.स.प पुणे शहर, पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील सर्व ज्ञातीसंसथा यांचे बहुमोल सहकार्य लाभले.अशी माहिती गणेश हिरवे यांनी दिली.







