मुंबई (प्रतिनिधी लक्ष्मण राजे) – पत्रकार उत्कर्ष समितीचे अंबरनाथ तालुकाध्यक्ष तसेच रोशनी न्यूज चेनेल चे उपसंपादक श्री शैलेश सणस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सध्या कोरोना ने जगभरात हाहाकार माजवला असतानाच रक्ताचा तुटवडा जाणवत आहे राज्य सरकारनेही याकरिता वारंवार आवाहन केले आहे.


हाच धागा पकडून श्री सणस यांनी आपल्या वाढदिवशी रक्तदान सर्वश्रेष्ठ दान आणि हेच सर्वात मोठे समाजकार्य हे हे दाखवून दिले आहे. त्यांच्या या कार्याचा अनेकांनी आदर्श घ्यावा असेच हे कार्य आहे
या कार्यक्रमावेळी परमपूज्य श्री समर्थ सद्गुरु सिताराम स्वामी शेडगे ( बाबा ) यांचे सुपुत्र श्री उमेश दादा शेडगे महाराज , एकविरा आई ग्रुपचे अध्यक्ष श्री अजय मोहरिकर, पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र अध्यक्ष डॉ अशोक म्हात्रे, कार्याध्यक्ष श्री अविनाश म्हात्रे , सचिव डॉ. वैभव पाटील,महिला उत्कर्ष समिती महाराष्ट्र कार्याध्यक्षा श्रुती उरणकर , नवी मुंबई अध्यक्ष श्री लालचंद यादव , मुंबई अध्यक्ष तथा आदर्श वार्ताहर वृत्तपत्राचे संपादक पंकज कुमार पाटील, प्रेरणा फाउंडेशनच्या प्रमूख प्रेरणा गावकर यांच्या सह अनेक पत्रकार बंधू उपस्थित होते.







