माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या कोकण परीवर्तन केंद्राच्या वतीने कोकण विकासाची चर्चा

suresh-prabhu

मुंबई (प्रतिनिधी लक्ष्मण राजे) – माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी त्यांच्या कोकण परिवर्तन केंद्राच्या वतीने कोकणचा कृषी विकास, उद्योग क्षेत्र व्यापार, सामाजिक, सांस्कृतिक आणि क्रीडा आदीच्या विकासाबाबत मार्गदर्शन व चर्चा करण्यासाठी तसेच संस्थेची पुढील वाटचाल आणि कार्यक्रम आखणीसाठी शनि. दि. १९ डिसेंबर २०२० रोजी सायंकाळी ४.३० वाजता अशोक गोयल ट्रस्ट,टाइम्स टॉवर १४ वा मजला, कमला मिल्स कंपाऊंड, लोअर परळ, येथे यशस्वी चर्चा करण्यात आली.

 

यावेळी विलास खानोलकर , मनोहर साळवी, दत्ताराम घुगे , दीपक चव्हाण , सनदी लेखापाल रामचंद्र गावडे आणि रवींद्र वाडेकर आदी मंडळी उपस्थित होते.याबाबत कोकणातील आपल्या परिवर्तन केंद्रातील अनेक सदस्यांचा मेळावा कोरोना नियम व अटी शिथिल झाल्यावर लवकरच घेण्याचे ठरविण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here