मुंबई (प्रतिनिधी लक्ष्मण राजे) – कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या काळात बरेच दिवस घरात बसलेल्या संगीतप्रेमी रसिकांचे मनोरंजन करण्यासाठी आता सर्व थिएटर बंद असल्याने डिजिटल प्लॅटफॉर्म वरुन सुरेल गाण्यांची संगीत मैफल आयोजित करण्याचा नवा ट्रेंड सुरू झाला आहे.या आॅनलाईन संगीत मैफलींना रसिक प्रेक्षकांनी पसंती दिली.
त्याच अनुषंगाने निर्माती दिग्दर्शक मनाली खातू यांच्या स्वरांजली प्रेझेंटस् ” तेरे सूर और मेरे गीत ” या लोकप्रिय सुरेल हिंदी चित्रपट गीतांच्या मनोरंजक कार्यक्रमाची निर्मिती करण्यात आली होती. निर्माती मनाली खातू यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या सुमधुर, सुरेल , अविस्मरणीय लोकप्रिय गीतांची ” तेरे सूर और मेरे गीत ” ही सुरेल संगीत मैफल डिजिटल प्लॅटफॉर्म वरुन आॅनलाईन सादर करण्यात आली.निर्माती मनाली खातू यांच्या स्वरांजली प्रेझेंटस् तर्फे सादर केलेल्या अविस्मरणीय सुमधुर लोकप्रिय गाजलेल्या गाण्यांच्या ” तेरे सूर और मेरे गीत ” या आॅनलाईन कार्यक्रमात डॉ.मेघना कुळकर्णी , स्नेहल जोशी , प्रतिक जाधव, रेणुका गोगटे , वीणा वैद्य , मणी अय्यर, स्नेहल पाठक, साक्षी प्रभू , मनाली खातू , शरद कांबळे, सुखदा ठाकुर , अनंत काटदरे , राणी काश्ते , आणि ज्योती अणावकर या गायकांनी गाजलेली मधुर गीते सादर केली.या सुरेल संगीत मैफिलीचे सुत्रसंचलन , निवेदन आर जे सोनाली पाठक यांनी केले. या यशस्वी आॅनलाईन कार्यक्रमाला रसिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. विशेषतः भारतासह कॅनडा , मास्को , यूएसए , यूएई , यूके अशा जगभरातील हिंदी चित्रपट गीतांच्या चाहत्यांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला.
असंख्य रसिकांनी इव्हेंट आॅर्गनाईझर मनाली खातू यांच्या यू ट्यूब चॅनल वरून अनेकदा आनंद घेतला . या अविस्मरणीय कार्यक्रमाच्या अभूतपूर्व यशानंतर मनाली खातू यांनी स्वरांजली तर्फे डिजिटल प्लॅटफॉर्म वरुन विविध संकल्पना घेऊन सुरेल हिंदी गाण्यांच्या मैफलीचे आयोजन करून रसिकांना घरबसल्या आनंददायी सुरेल , मधुर हिंदी चित्रपट गीतांचा नजराणा देण्यासाठी स्वरांजली सदैव प्रयत्नशील राहील असे मनोगत व्यक्त केले .







