पोलिस जाणिव सेवा संघाच्यावतीने बालाजी डोईफोडे यांचा कोविड योध्दा म्हणून सन्मान

police-janiv-seva-sangh

सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी विजय कुमार दिवाणजी) – बार्शी येथील घटनाचक्रचे पत्रकार तथा सहजीवन परिवाराचे अध्यक्ष बालाजी श्रीरंग डोईफोडे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून पोलीस जाणिव सेवा संघाच्यावतीने त्यांना कोविड योध्दा म्हणून सन्मानीत करण्यात आले.

लॉकडाऊनच्या कठीण काळात सहजीवन परिवाराच्यावतीने गरजू नागरिकांना अनेक प्रकारची मदत करण्यात आली. तसेच घटनाचक्रच्या माध्यमातून बार्शी शहर व ग्रामीण भागात कोरोनाविषयक तसेच आरोग्यविषयक नियमांची माहिती देण्याचे काम करण्यात आले.

बालाजी डोईफोडे यांच्या सन्मान समारंभात पोलिस जाणिव सेवा संघाचे विभाग प्रमुख उमेश अनेराव, बालाजी ताकभाते, राहुल नागटीळक, सुनील नवले, अनिल जाधव, चैतन्य दिवाणजी, सोनू खंडागळे, उत्कर्ष टोपे व पोलिस न्यूज रिपोर्टर राहुल वाणी आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here