इंडीयन ऐडल्ट एजुकेशन असोसिएशन,दिल्ली ह्यांच्या कार्यकरणी समितीत प्रा.डॉ. आशा पाटील ह्यांची नियुक्ती

dr-aasha-patil

मुंबई (प्रतिनिधी लक्ष्मण राजे) – इंडीयन ऐडल्ट एजुकेशन असोसिएशन,दिल्ली ह्यांच्या कार्यकरणी समितीत एस.एन.डी.टी महिला विद्यापीठच्या प्रा.डॉ.आशा पाटील ह्यांची नियुक्ती करण्यात आली.

इंडीयन ऐडल्ट एजुकेशन असोसिएशन,दिल्ली ही संस्था स्वातंत्र्यपूर्व काळापासून प्रौढ शिक्षणासाठी ही संस्था कार्यरत आहे.नुकत्याच झालेल्या इंडीयन ऐडल्ट एजुकेशन असोसिएशन,दिल्ली ह्यांच्या कार्यकरणी समितीच्या निवडणुकीत ही नियुक्ती करण्यात आली.

प्रा.डॉ.आशा पाटील ह्यांचा गेली 35 वर्षे प्रौढ शिक्षणतील अनुभव नक्कीच संस्थेच्या वाटचालीस मार्गदर्शक ठरेल.ह्या नियुक्तीबद्दल सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. भविष्यात प्रौढ शिक्षणासंदर्भात नविन प्रयोगशील उपक्रम तसेच विविध विषयांवर वेळोवेळी प्रतिनिधित्व करुन ते अमलात आणण्यासाठी नक्कीच प्रयत्न करु असे मत एस.एन.डी.टी महिला विद्यापीठच्या आजीवन अध्ययन आणि विस्तार विभाग व समाज कार्य विभागाच्या संचलिका प्रा.डॉ.आशा पाटील ह्यांनी व्यक्त केले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here