कोरोना योध्यांचा सत्कार उत्साहात संपन्न

raigad-corona-yodha-1

मुंबई (जगदीश काशीकर) – श्री छत्रपती शिवाजी महाराज सेना हिंदुस्थान व शिवप्रतिष्ठान, श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था – उरण महाराष्ट्र या सामाजिक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने उरण तालुक्यातील कोप्रोली येथील जिल्हा परिषद शाळेत कोरोना काळात लोकडाऊन दरम्यान जनतेची निःस्वार्थ वृत्तीने कार्य केलेल्या डॉक्टर, नर्स, हॉस्पिटल कर्मचारी, पोलीस अधिकारी – कर्मचारी, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार आदींचा कोरोना योद्धा म्हणून शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

 

raigad-corona-yodha

raigad-corona-yodha-2
कोरोना काळात निःस्वार्थ वृत्तीने कार्य केलेल्या व्यक्तींचा विशेष सन्मान व्हावा, निःस्वार्थ वृत्तीने कार्य करणाऱ्या व्यक्तींची समाजाला ओळख व्हावी, व या व्यक्तींपासून इतरांना चांगले काम करण्याची प्रेरणा मिळावी या दृष्टिकोनातून कोरोना योध्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आल्याचे श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेचे कार्याध्यक्ष विठ्ठल ममताबादे यांनी प्रास्तविक करताना सांगितले.

raigad-corona-yodha-3

कोप्रोली येथे आयोजित केलेल्या कोरोना योद्धा सत्कार कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष आदर्श शिक्षक सुधीर मुंबईकर, अध्यात्मिक क्षेत्रातील चंदन महाराज, रायगड भूषण राजू मुंबईकर, डॉ मनोज भद्रे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी शिक्षण क्षेत्रात राहून कोरोना काळात सामाजिक कार्य करणाऱ्या आदर्श शिक्षक सुधीर मुंबईकर, शिक्षक कौशिक ठाकूर, वैद्यकीय क्षेत्रातील डॉ निलेश वीर, उरण,डॉ मनोज भद्रे (इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय उरण), डॉ सत्या ठाकरे, नर्स – सुमित्रा बबन पाटील. (MGM हॉस्पिटल नवी मुंबई ), डॉ सिद्धराम पाटील (उरण ), रत्नाकर म्हात्रे (वॉर्ड बाय, हिंदुजा हॉस्पिटल, माहीम मुंबई ), पोलीस प्रशासनातील उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक – जगदीश कुलकर्णी, सचिन केकरे (पोलीस ठाणे उरण – क्लार्क ), पोलीस अधिकारी – रवींद्र पाटील, गोदूराम बांगर, सुर्यकांत गंभीर, आशिष दरगोरे, शशांक केणी, स्वच्छता विभागातील सिद्धार्थ कासारे (नगर परिषद कर्मचारी), धनेश कासारे (नगर परिषद कर्मचारी), मीनाक्षी कोळी, सामाजिक क्षेत्रातील मा. आमदार श्री. बच्चुभाऊ कडू, संतोष पवार, प्राध्यापक राजेंद्र मढवी, आकाश शाह -उरण, सुनील वर्तक, राजू मुंबईकर, JNPT विश्वस्त भूषण पाटील, राजू भंडारे, चैताली म्हात्रे, रंजना गायकवाड, कुमार ठाकूर, कुंदन म्हात्रे, निर्मला नरेश म्हात्रे, गुरुनाथ भगत, प्रवीण लोहार, अध्यात्मिक क्षेत्रातील चंदन महाराज, पत्रकारिता क्षेत्रातील पत्रकार दिनेश पवार, पत्रकार सुभाष कडू, पत्रकार घनश्याम कडू, पत्रकार संजय गायकवाड, पत्रकार दिलीप कडू आदी कोरोना काळात आपल्या जीवाची पर्वा न करता निःस्वार्थ वृत्तीने कार्य करणाऱ्या या सर्व सन्माननीय व्यक्तींचा कोरोना योद्धा म्हणून सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक नितेश पंडित यांनी तर आभार प्रदर्शन सुनील वर्तक यांनी केले.

raigad-corona-yodha-4

सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुदेश पाटील, कार्याध्यक्ष विठ्ठल ममताबादे, उपाध्यक्ष हेमंत पवार, सचिव – प्रेम म्हात्रे, सदस्य – ओमकार म्हात्रे, गणेश म्हात्रे, कुमार ठाकूर, सुरज पवार आदी सदस्यांनी विशेष मेहनत घेतली.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here