भारतीय जनता पार्टीचा जनआक्रोश हंडा मोर्चाने दणाणले धरणगाव शहर

dharangaon-morcha

धरणगाव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) – धरणगाव शहरात भारतीय जनता पार्टीने गेल्या 15 ते 20 वर्षापासून असलेल्या पाण्याचा समस्येवर मोर्चा काढणार असे जाहिर केले होते. त्यामुळे आज दि.21-12-20 सकाळी 10:00 वा. जनआक्रोश हंडा मोर्चा बालाजी मंदिरा पासुन भाजप तर्फे नगरपालिकेवर काढण्यात आला. सदर मोर्चात संतप्त महिला,नागरीक अबाल वृद्ध शेकडोच्या संख्येने हंडा व मडक्यासह सहभागी होऊन पालकमंत्री व पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आणि सत्ताधारी शिवसेना नगराध्यक्ष,नगरसेवक यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या.पाणी दया!पाणी दया!पाणीपुरवठामंत्री पाणी दया!या घोषणानी संपूर्ण शहर दणाणले. नगरपालिकेत मोर्चा येताच संतप्त नागरीकांनी नगरपालिकेत मडके फोडून संताप व्यक्त केला,नागरीकांच्या पाण्यासाठी भावना सत्ताधारींना नगरपालिकेत केलेल्या घोषणा बाजीने कळल्या असतील.

 

dharangaon-madke-morcha

शेवटी मोर्चाचे रूपांतर सभेत झाले गटनेते कैलास माळी सरांनी पाणी पुरवठा सुरळीत होत नसेल तर राजीनामे देऊन खुर्च्या खाली करा असे आपल्या भाषणात सांगितले.त्यानंतर मधुकर रोकडे यांनी लोकांच्या तोंडचे पाणी हिसकवून रस्ते,गटर,ढापे बनवून भ्रष्टाचार करणाऱ्या सत्ताधाऱ्यांना इथेच भरावे लागेल.असे सांगितले
तालुकाध्यक्ष जिजाबराव पाटील यांनी पालकमंत्री व पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचा निषेध व्यक्त केला.त्यानंतर भाजप नेते अँड.संजय महाजन यांनी विस वर्षात वेळोवेळी पाण्याचे आश्वासन देऊन गुलाबराव पाटील आमदार चे नामदार झाले,तरी धरणगावातील पाण्याची समस्या सोडवू शकत नसेल तर येत्या काळात यापेक्षाही मोठा हल्लाबोल मोर्चा काढण्यात येईल अशे आपल्या भाषणात सांगितले,सदर प्रसंगी गुलाबराव मराठे यांनी सूत्रसंचालन केले तर अँड.वसंतराव भोलाने यांनी निषेध व्यक्त करत आभार मानले.

मोर्चात शिरीषआप्पा बयस, प्रकाशदादा सोनवणे,शेखरदादा पाटील, पुनिलालआप्पा महाजन,शहराध्यक्ष दिलीप महाजन,नगरसेवक शरदअण्णा कंखरे,ललित येवले,भालचंद्र माळी,संगीताताई मराठे,शोभाताई राजपुत,कड़ुआप्पा बयस,महिला अध्यक्ष प्रमिलाताई रोकडे,माजी नगरसेविका चंद्रकला भोलाने,कल्पना महाजन,भास्कर मराठे,सुनिल चौधरी,राजेंद्र महाजन,संजय पाटील,योगेश ठाकरे,सरचिटणीस कन्हैया रायपुरकर,सचिन पाटील,आनंद वाजपेयी,हितेश पटेल,प्रल्हाद पाटील,विजय महाजन,अमोल कासार,जुलाल भोई,संजय कोठारी,किशोर चौधरी,भूषण कंखरे,किशोर माळी,निलेश माळी,डोंगर चौधरी,शरद भोई,एकनाथ पाटील,अनिल महाजन,योगेश महाजन,आनंदा धनगर,इत्यादी कार्यकर्ते पदाधिकारी सह गावातील महिला नागरीक उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here