विश्व मराठी संमेलन २०२१ ऑनलाईनची जय्यत तयारी

online-marathi-sahitya-samelan

मुंबई (जगदीश काशीकर) – विश्व मराठी संमेलन २०२१ ऑनलाईन ची जय्यत तयारी सुरू आहे. ७ ते १७ डिसेंबर दरम्यान संमेलनातील भाषण, परिसंवाद आणि सांस्कृतिक कार्यक्रम यांचे रेकॉर्डिंग भरत नाट्य मंदिर, पुणे येथे सुरू आहे.
या संमेलनात होणाऱ्या परिसंवादामध्ये राहुल सोलापूरकर, दिपक शिकारपूरकर, समीरन वाळवेकर, डॉ. विश्वास मेहेंदळे, विवेक वेलणकर, ल. म. कडू, सुनंदन लेले, गिरीश प्रभुणे, पं. विकास कशाळकर, ज्येष्ठ सतारवादक उस्मान खान, प्रख्यात नृत्यांगना मनीषा साठे, ज्येष्ठ पत्रकार मोरेश्वर जोशी अशा मान्यवरांनी सहभाग घेतला असून, सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यासाठी महाराष्ट्रातील बांधवांना आवाहन केले होते. कोल्हापूर, जेजुरी, बदलापूर, नंदूरबार, जळगाव, भंडारा, नागपूर, सोलापूर, दापोली, पालघर, मंचर, आटपाडी, कणकवली, कर्जत अशा वेगवेगळ्या ठिकाणहून कलाकार आले होते. वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम उदा. मंगळागौर, भोंडला, खंडोबाचा गोंधळ, देवीचे जागरण, वाघ्या मुरळी, पोवाडा, वासुदेव, मर्दानी खेळ, भारुड, कविता वाचन – कट्टीबट्टी अशा वेगवेगळ्या संस्कृती जपणाऱ्या कार्यक्रमांचे रेकॉर्डिंग करण्यात आले.

vishva-marathi-samelan

 

युरोपमधील १५ देश, अमेरिकेतील १२ राज्ये, गल्फमधील १२ देश, ऑस्ट्रेलिया हे स्वतंत्र सांस्कृतिक कार्यक्रम रेकॉर्ड करून पाठवत आहेत. मराठी ग्रंथ संग्रहालय, ठाणे यांनी संमेलनाच्या निमित्ताने आदरणीय डॉ. अनिल काकोडकर आणि प्रा. क्षितिज पाटुकले यांची मुलाखत आयोजित केली होती. डॉ. अनिल काकोडकर सरांनी या संमेलनाची आवश्यकता प्रतिपादित केली. त्याची लिंक पुढीलप्रमाणे आहे. https://www.facebook.com/Marathigranthsangrahalaythane/

 

 

आजअखेर पर्यंत संमेलनासाठी २९,२६८ बांधवांनी नोंदणी केली आहे. विविध देशातील स्वागताध्यक्षांचा संमेलनाला शुभेच्छा देणारा व्हिडिओ लवकरच सर्वांसोबत शेअर करित आहोत.. जयश्री दंडवते, केदार लेले आणि राजीवजी सुभेदार यांच्या सहयोगाने Nusound radio, London या रेडिओ स्टेशनवर संमेलनाची जाहिरात प्रदर्शित होत आहे. गल्फ कंट्रिजमधून गजानन खोलगाडे यांच्या नेतृत्वातून तेथील महाराष्ट्र मंडळे एक विशेष सांस्कृतिक कार्यक्रम सादर करित आहेत.
स्वित्झर्लँडमधून अमोल सावरकर, अबुधाबीमधून धनंजय मोकाशी, केनियामधून राज पाटील, तैवानमधून डॉ. प्रसाद जोशी, चीन मधून दीपक शिंदे आणि त्यांची टीम सांस्कृतिक कार्यक्रम सादर करित आहेत. प्रख्यात उद्योजक आनंद देशपांडे, पर्सिस्टंट आणि श्री. रवी पंडीत, के. पी. आय. टी. यांची मुलाखत नुकतीच घेण्यात आली. मा. सुधा मूर्ती, इन्फोसिस फाउंडेशन यांनी संमेलनासाठी व्हिडिओ पाठवला आहे. दिलीपजी करंबळेकर, माजी अध्यक्ष, विश्व कोष प्रकल्प यांनी परिसंवादासाठी व्हिडिओ पाठवला आहे. गिरीशजी प्रभुणे, ( संस्थापक, पुनरुत्थान समरसता गुरुकुलम्, भटके, विमुक्त, फासेपारधी समाजाच्या विकासासाठी कामे ) यांनी परिसंवादमध्ये सहभाग घेतला आहे.

 

१० लाख (1 million) मराठी बांधवांची संमेलनासाठी नोंदणी करावी असे भव्य उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेवून आपण नियोजन करित आहोत. संमेलनासाठी अजून ४० दिवस बाकी आहेत. आपण अधिकाधिक जणांची नोंदणी व्हावी म्हणून जोरदार प्रयत्न करावेत अशी आपणा प्रत्येकाला व्यक्तीश: विनंती आहे. कृपया mission म्हणून या टारगेटकडे पहावे. 1 million ही संख्या मराठी जगतामध्ये क्रांती घडवेल असा विश्वास आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्याने हे लक्ष्य प्राप्त करू असा विश्वास वाटतो. असे आग्रही प्रतिपादन सौ.कल्याणी कुलकर्णी, मुख्य समन्वयक – उपक्रम, विश्व मराठी परिषद यांनी यावेळी केले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here