खाजगी दवाखाना व डॉक्टर प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांच्या चौकशी आदेशपत्राला जिल्हा शल्यचिकित्सकाने केराची टोपली दाखवली

जळगांव (संपादक सुनिल पाटील) – शहरातील खाजगी डॉक्टर हे रूग्णांवर तपासणी न करता परस्पर बाहेरूनच रवाना करीत असून त्यामुळे ते रुग्ण मार्गातच मृत घोषित करण्यात आलेले आहे त्यामुळे या डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे हे रुग्ण मेले असून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी जळगाव जिल्हा मानियार बिरादरीचे अध्यक्ष फारुख शेख यांनी लेखी निवेदनात मार्फत जिल्हाधिकारी,जळगाव यांना १३ जून रोजी मागणी केली होती.
त्यानुसार जिल्हाधिकारी जळगाव यांनी जिल्हा शल्यचिकित्सक जळगाव यांना सदर प्रकरणी चौकशी करून कारवाई करण्याचे लेखी आदेश दिले होते. सदरच्या पत्रावर अद्याप काय कारवाई झाली म्हणून फारुक शेख यांनी ९ जुलैला जिल्हा शल्यचिकित्सक यांची भेट घेतली असता त्यांनी स्पष्टपणे सांगितले की अशी कोणतीही चौकशी माझ्याकडे आलेली नाही किंवा जिल्हाधिकाऱ्यांनी मला असे आदेश दिले नाही
सदर प्रकरणी १० जुलै रोजी फारूक शेख यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन अधिक चौकशी केली असता दिनांक १४ जुन रोजी पत्र क्रमांक स्वीस/ २३३४२/२० नुसार ते पत्र जिल्हा शल्य चिकित्सक यांना पाठवण्यात आल्याचे दिसून आले म्हणून जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या कार्यालयात चौकशी केली असता ते पत्र १६ जुन रोजी आवक क्रमांक ३७२६ नुसार नोंदणीकृत झालेले व त्यावर जिल्हा शल्यचिकित्सक यांनी स्व अक्षरात पीएचएन- इंस्ट्रुक्ट टू ऑल असे रिमार्क मारून त्या खाली स्वाक्षरी सुद्धा केली आहे व ते पत्र कोविड विभागाला पाठवले होते.
सदर बाबत पीएचएनच्या वानखेडे मॅडम यांना भेटून चौकशी केली असता या पत्रावरून आम्ही आय एम ए ला पत्र दिले आहे की आपण सर्व खाजगी डॉक्टरांना पत्र द्या व दवाखाने चालू ठेवा असे पत्र दिले आहे परंतु असे पत्र त्यांनी शोधले परंतु मिळून आले नाही. परंतु जिल्हा अधिकारी च्या पत्राला फाईल करून ठेवून दिले चे दिसून आले.
मानियार बिरादरी ने आपल्या चार पानी पत्रात सविस्तर रुग्णाचे नाव, तारीख , डॉक्टरांचे नाव नमूद केलेले होते व त्यांनी रुग्णाला बघितले नाही किंवा तपासले नाही अथवा तपासण्यास नकार दिला त्यामुळे त्या रुग्णांचे सरकारी दवाखान्यात जाताना मृत्यू आले अशा रुग्णांची नाव पत्ते देऊन सुद्धा जिल्हाशल्य चिकिस्तक यांनी कोणत्याही स्वरुपाची चौकशी न करता जिल्हाधिकाऱ्यांचे पत्र एकप्रकारे कचऱ्याच्या कुंडीत टाकले असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
जिल्हा सामान्य रुग्णालयात एक वृद्ध महिला टॉयलेटमध्ये मेलेली आढळल्यामुळे त्या वृद्धेच्या मृत्यूस कारणीभूत म्हणून पाच वरिष्ठ डॉक्टर ,नरसिंग स्टॉफ व सफाई कर्मचारी अशा सुमारे आठ ते दहा लोकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदविण्यात आला असून त्या सर्वांना निलंबित करण्यात आलेले आहे म्हणजे एकीकडे सदर वृद्ध महिलाही टॉयलेट मध्ये मेली असली तरी तिच्या मृत्यूस पाच वरिष्ठ डॉक्टरांना सदोष मनुष्यवधाचा कलमा खाली कारवाई करण्यात येऊन निलंबित करण्यात येते तर जळगावचे मोठे हॉस्पिटल- मोठे डॉक्टर रुग्णांना तपासणी न करता अथवा एडमिट न करतात वाऱ्यावर सोडून देते व त्या रुग्णाचे जीव जाते तरीसुद्धा त्या डॉक्टरांच्या विरोधात गुन्हा काय साधी चौकशी सुद्धा जिल्हा शल्यचिकित्सक करीत नाही याचा अर्थ काय? एवढेच नव्हे तर जिल्हा शल्यचिकित्सक यांनी त्या चौकशी पत्रावर इंस्ट्रक्ट टू ऑल असे लिहले म्हणजे कोणाला सूचना द्यावी ,कशा पद्धतीच्या सूचना द्याव्यात हे नमूद नाही व ९ जुलै पर्यंत त्या सूचना देण्यात सुद्धा आल्या नाही.
पुन्हा चौकशीची मागणी माननीय जिल्हाधिकारी यांच्या पत्रावर जिल्हा शल्यचिकित्सक यांनी सात दिवसात चौकशी न केल्यास सदर प्रकरणी स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल व न्यायालयीन कारवाई करण्याचा इशारा मानियार बिररदारीचे अध्यक्ष फारुक शेख यांनी एका पत्रकाद्वारे केला आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here