आज शिरपूर तालुक्यातील विद्यार्थी व युवकांचा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेत प्रवेश

shirpur-mnc

शिरपूर (प्रतिनिधी प्रशांत वाकडे (वरुळ) – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे, अमितसाहेब ठाकरें यांच्या मार्गदर्शनाने व आदित्य शिरोडकर, प्रदेशाध्यक्ष मनविसे व मनवीसे धुळे जिल्हा संपर्क अध्यक्ष. गणेशदादा बुरकुल यांच्या आदेशाने मनविसे धुळे जिल्हा अध्यक्ष प्रसाद देशमुख यांच्या नेतृत्वात आज दि.२० डिसेंबर रोजी, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेत शिरपूर तालुक्यातील असंख्य तरुणांनी राज ठाकरेंच्या विचारांनी प्रेरित होऊन जाहीर प्रवेश केला व .विविध समित्यांवर त्यांची पद नियुक्ती करण्यात आली.

 

shirpur-mnc

या कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे धुळे जिल्हा उपाध्यक्ष पुनमचंद मोरे,सोनू राजपूत, चेतन पाटील,राहुल शिराळे यांनी केले. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेनेचे धुळे जिल्हा अध्यक्ष.संजय नंदुरबारे, मनसेचे धुळे जिल्हा उपाध्यक्ष.राकेशभाऊ चौधरी,अविनाश ठाकूर, समस्त पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here