मुंबई (प्रतिनिधी प्राजक्ता अरूण चव्हाण) – आयुष्यातील २० मिनिटे आणि शरीरातील ३५० मिली रक्त एखाद्या व्यक्तीला जीवनदान देऊ शकते. अशा वाक्याने आवाहन करत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन रविवार, दिनांक २० डिसेंबर २०२० रोजी सकाळी १० वाजता सुरू होवून ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत वरळी भागातील पोलीस कॉलनीमध्ये अष्टविनायक क्रीडा मंडळद्वारे आयोजित करण्यात आले होते.
कोरोना काळात पेशेंटच्या उपचारासाठी ब्लड प्लाझ्माची अत्यंत आवश्यकता निर्माण होत आहे. राज्यात रक्ताचा तुटवडा भासू लागल्याने त्याच्या उपलब्धतेसाठी हे रक्तदान शिबिर के. ई. एम. हॉस्पिटल आणि प्रिन्स अली खान हॉस्पिटल ब्लड बँक माझगाव मुंबई यांच्या सहयोगाने अष्टविनायक क्रीडा मंडळाच्या सहभागाने आयोजित करण्यात आल होतेे. या शिबिरास समाजभान जपणाऱ्या नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जवळ जवळ दुपारी २ वाजेपर्यंत १०१ रक्त दात्यानी रक्तदान केले.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष विश्वास आव्हाड तसेच मिस साऊथ मुंबई विनर कु. निता नावर आणि कार्यकर्ते टीम महेश श्रीसागर, संकेत बुरटे, नितीन नवार, उदय चौघुले, अभिजित पेडणेकर, सुहास भोगले, रितेश खंदारे, कुमार सेकरी, राणी नलावडे, अर्चना सोनावणे, स्वाती माने इत्यादी उपस्थित होते. या टीम मधील ज्यांची प्रकृती स्वस्थ आहे. अशा सर्व सदस्यांनीही रक्तदान ही केले.







