सुसाईड पाॅइंटवरून सेल्फी घेण्याचा मोह बेतला जीवावर

sucide-point
संग्रहित छायाचित्र

किन्नौर – फिरायला गेल्यानंतर अवघड ठिकाणावरून सेल्फी घेण्याचा अनेकांना छंद असतो. मात्र, हा छंद हरियाणातील एका महिलेला चांगलाच महागात पडला आहे. सुसाईड पाॅइंटवरून सेल्फी घेताना महिलेचा पाय घसरला आणि खोल दरीत पडून महिलेचा मृत्यू झाला आहे. ही घटना किन्नौरच्या कल्पा आणि रोघी गावादरम्यान असेलेल्या खोल दरी सुसाईड पाॅइंटवर शनीवारी घडली आहे.

 

पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हरियाणाची एक महिला किन्नोर येथील कल्पामध्ये फिरण्यासाठी आली होती. महिला आणि वाहनचालक फिरण्यासाठी सुसाईड पाॅइंटच्या दिशेने निघाले होते. त्यावेळी महिलेला आपल्या फोनमध्ये त्या पाॅइंटवर सेल्फी घेण्याचा मोह झाला.

 

सेल्फी घेत असताना महिलेचा पाय घसला आणि ती खोल दरीत कोसळली. पोलीसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर शोधकार्य सुरू झाले. मात्र रात्री अंधार असल्यामुळे शोध लागला नाही. दिवसा पुन्हा शोधकार्य सुरू असताना महिलेचा मृतदेह सापडला.पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. सोबतच महिलेच्या गाडीचा चालक याचीही चौकशी केली जात आहे. अशी माहिती एसडीएम कल्पा मेजर अवनींद्र शर्मा यांनी दिली.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here