ग्रामपंचायत निवडणुक लोणवाडीत राजकीय हालचालींना वेग
बोदवड (प्रतिनिधी ज्ञानेश्वर पारधी) – तालुक्यातील लोणवाडी येथील ग्रामपंचायतीच्या निवडणूकीची मुदत नोव्हेंबर महिन्यात संपल्यानंतर नुकतेच ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर झाली. त्यामुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे. वार्ल्डातील आरक्षण जाहीर झाले आसले तरीही संरपच पदांचे आरक्षण अद्याप पर्यत जाहीर झाले नसल्यामुळे काही इच्छुक उमेदवारांची हिरमोड झाल्याचे चित्र आहे.
इच्छुक मंडळींनी आप आपल्या वॉर्डात छुप्या पद्धतीने प्रचारांना सुरवात केली असून प्रभागांतील उमेदवारी चाचणी केली आहे इच्छुक उमेदवारांनी नेते मंडळींकडे आपल्या नावाची फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. ग्रामपंचायतीची निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. इच्छुक उमेदवार मतदार राजाच्या अडीअडचणी विचारून त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न जात आहे. तर काही उमेदवार घरोघरी जाऊन लोकांच्या अडीअडचणी जाणुन घेत आहे.
कधी नव्हे वाड्या वस्ती कडे फिरणारे इच्छुक उमेदवार वस्तीवर आल्यामुळे मतदारराजाकडुन आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अद्याप पर्यत संरपच पदांचे आरक्षण सोडत जाहीर झालेल्या नसल्याने म्हणावा तसा ग्राम पंचायत निवडणूक राजकीय रंग आला नाही त्यामुळे संरपच पदांचे आरक्षण अद्याप पर्यत जाहीर होणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. त्यांमुळे संरपच पदांच्या आरक्षण सोडती नंतर येथील राजकीय समीकरणे वेग घेणार आहे. तेव्हाच मोर्चा बांधणीला खरी सुरुवात होण्याची शक्यता आहे.







