नाशिक (विशेष प्रतिनिधी इंजि कुबेर जाधव) – सध्या कांदा लागवड मोठ्या प्रमाणात सुरू झालीय हवामान पण बिघडलं सध्या दिवसा वीज कमी आणि रात्री ची वीज दिल्याबद्दल आपल्या सरकार चे प्रथमतः आभार च मानतो..कारण बिबट्या, वाघ,साप,विंचु हिंसक प्राणी हे शेतकऱ्याचे मित्र च आहेत असे तुम्हाला वाटते म्हणून शेतीला रात्री वीज देता…
दुसरे असं कि कांदा निर्यात बंदी कधी उठवणार एका बाजुला कृषी बील पास करायचं शेतकरी कुठं ही माल विकायला जाऊ शकतो परदेशात पण असं सांगितलं जातं आणि त्यांच्या मालाला बाजार वाढले कि निर्यात बंदी करायची … उत्तर महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींना कांदा उत्पादक शेतकर्या चं एकच सांगणे आहे कि कांद्याला उद्योगाचा दर्जा कधी मिळणार.. कांदा पिकवितांना शेतकरी कधीच कोणाला विचारत नाही तो त्याच्या हिंमतीवर कांदा पीक घेतो रोप एकदा, दोन दा खराब झाले तरी कर्ज करतो पण तिसरांद्या परत रोप तयार करतो पण कांदा लागवड करतो कांदा लागवड करतांना कधीही सरकारी आधीकारी किंवा लोकप्रतिनिधी त्याच्याकडे येत नाही
त्याला किती कष्ट आहेत त्याला किती अडचणी आहेत त्याला पाणी आहे का मजुर मिळतात का वीज मिळते का? देशाची कांद्याची गरज किती हे सांगायला सुद्धा कोणी येत नाही…. निसर्गाने जर घाला केला कांदा सडला तुटवडा निर्माण होवुन जर बाजारभाव वाढायला लागले तर लगेच निर्यात बंदी आयात धोरण एरवी किती कांदा लागवड केली हे पहायला साधा तलाठी कधी नाही येत पण भाव वाढल्यावर केद्रातलं पथक लगेच येतं …वाईट अवस्था आहे कांदा उत्पादकाची याला जबाबदार आहेत तर या कांदा उत्पादक पट्यातील लोकप्रतिनिधी यांनी केंद्रात व राज्यात सरकार मध्ये कधी कांद्याची बाजुच मांडली नाही कायम पक्षाची च बाजु मांडली..
कांदा पीक घेतांना किती हाल अपेष्टा हवामानाशी ,किडरोगाशी लढावे लागते.कांदा पीक किती खर्चीक आहे अशिक्षीत मजुरांचा रोजगार आहे हे सरकार ला लोकप्रतिनिधी सांगायला कमी पडतात कि काय का खुर्ची जाईल हि भीती असते आता तरी लोक प्रतिनिधी नी कांदा पीकाची बाजु लावुन धरावी कारण कांदा हा मोठा रोजगार निर्माण करणारे पीक आहे कांदा निर्यात धोरण व्यवस्थित वापरावे आपण परदेशातील ग्राहक गमवत आहोत जर कांदा पिकाला वर्ष भर योग्य भाव मिळाळा तर ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ मिळेल ग्रामीण रोजगार वाढले तर शहरावर येणारा ताण कमी होईल….







