वीरजवान अमित पाटील यांच्या कुटूंबियांचे पालकमंत्र्याकडून सात्वंन

gulab-patil

धरणगाव (उपसंपादक प्रा.पी.एम.पाटील) – कर्तव्य बजावत असताना वीरगती प्राप्त झालेले चाळीसगाव तालुक्यातील वाकडी येथील जवान अमित पाटील यांच्या कुटूंबियांची आज राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी भेट घेऊन सात्वंन करुन शोक व्यक्त केला.

जम्मूमधील पूंछ भागात कर्तव्य बजावत असताना वाकडी गावचे सुपुत्र, सीमा सुरक्षा दलातील जवान अमित पाटील यांना 16 डिसेंबर रोजी वीरगती प्राप्त झाली. आज पालकमंत्री ना. पाटील यांनी वीरजवान अमित पाटील यांच्या मुळगावी वाकडी येथील घरी जाऊन त्यांचे वडिल साहेबराव पाटील, आई सकुबाई पाटील, पत्नी वैशालीताई पाटील, भाऊ, बहिण व मुलांची भेट घेऊन त्यांचे सात्वंन केले.mla-gulabrao-patil

वीरजवान अमित पाटील यांना भारतमातेची सेवा करीत असताना वीरगती प्राप्त झाली आहे. त्यांनी देशाच्या सेवेसाठी दिलेले बलीदान व्यर्थ जाणार नाही अशा भावना व्यक्त करुन पालकमंत्री ना. पाटील म्हणाले की, वीरजवान अमित पाटील यांच्या कुटूंबियांना शासनातर्फे सर्वोतोपरी मदत करण्यात येईल.

यावेळी महेंद्र पाटील, रमेश पाटील, दिलीप घोरपडे, नानभाऊ कुमावत, भावडू गायकवाड, नकुल पाटील, मोती आप्पा पाटील, निलेश गायके, वसीम चेअरमन यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here